20 April 2025 8:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

तुमचं उत्पन्न टॅक्स फ्री? थांबा!...तुम्ही आकड्यांच्या खेळात अडकलात

Old Tax Slab, News tax Slab, Union Budget 2020, Finance Minister Nirmala Sitharaman

नवी दिल्ली: सामान्य लोकांना आधीच आयकरातील आकड्याचं गणित लक्षात येत नाही. त्यात अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबबाबत अर्थमंत्र्यांनी सांगितलेले आकडे लोकांना डोकं खाजवायला लावणारे आहेत. नेमकं कितीपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, किती उत्पन्नापासून टॅक्स भरावा लागणार, जर टॅक्स भरावा लागत असेल, तर किती टक्के भरायचा असे सगळे प्रश्न डोक्यातील मेंदूचा चुराडा करणारे आहेत. त्यातच आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात टॅक्सस्लॅब घोषित करताना, ५ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असल्याचं म्हटलं. परंतु नंतर त्यांनी टॅक्सस्लॅब सांगून २.५ ते ५ लाखाच्या उत्पन्नावर ५ टक्के कर असेल असं सांगून गोंधळात टाकलं. त्यानंतर त्यांनी पुढील टॅक्स स्लॅब सांगितले.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत घोषणा केलेल्या कररचनेला जुन्या कररचनेचाही पर्याय देण्यात आला आहे. म्हणजे जुन्या किंवा नव्या टॅक्सस्लॅब या दोन्ही पद्धतीने तुम्ही रिटर्न फाईल करु शकता. परंतु मोदी सरकारने यामध्ये आकडयांचा खेळ केला आहे. कारण नवे टॅक्सस्लॅब दिलासा देणारे वाटत असले, तरी या याद्वारे टॅक्स भरताना तुम्हाला कोणतीही सवलत मिळणार नाही.

नवीन पर्याय निवडल्यास आधीप्रमाणेच ५ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या कोणालाही यापुढे कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागणार नाही. परंतु आधीच्या कररचनेत ५ ते १० लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर लागत होता. आता त्याचे दोन भाग विभाजित करण्यात आले आहेत. नवीन पर्याय स्वीकारल्यास ५ लाख ते ७.५ लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर लागेल आणि ७.५ ते १० लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर आकारण्यात येणार आहे. अर्थात, हा फायदा जवळपास ७० करसवलतींवर पाणी सोडले तरच मिळणार आहे. थोडक्यात करदात्यांना एका हातानं लाभ देऊन दुसऱ्या हातानं तो काढून घेतल्याचं दिसत आहे.

यातली विशेष बाब म्हणजे नवीन करप्रणालीमध्ये पहिल्यापेक्षा जास्त कर जाणार आहे की खरंच कर वाचणार आहे हेच स्पष्ट होत नाही. बजेटनंतरच्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अर्थमंत्र्यांनी सांगितलं की जवळपास १०० च्या आसपास करसवलती व करवजावटी जुन्या करप्रणालीमध्ये आहेत. त्यातल्या जवळपास ७० सलवतींवर नवीन करप्रणाली स्वीकारली तर पाणी सोडावं लागणार आहे. या नक्की कुठल्या आहेत, व राहिलेल्या सवलती कुठल्या आहेत हे ही स्पष्ट नसून या गोष्टी लवकरच वेबसाईचवर अपलोड करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे तूर्तास तरी हुरळून जाण्यासारखी स्थिती नसून करदात्यांना खरंच कमी कर भरावा लागणार आहे की या सरकारनं आवळा देऊन कोहळा काढला हे समजायला काही वेळ जावा लागणार आहे.

नवे टॅक्स स्लॅब ऐच्छिक असतील, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. एखाद्या व्यक्तीला या सुविधांचा लाभ घ्यायचा असल्यास त्याला आतापर्यंत मिळणाऱ्या सवलती सोडाव्या लागतील. विम्याचे हप्ते, गुंतवणूक, घर भाडं, मुलांचं शैक्षणिक शुल्क यासारख्या ७० मुद्द्यांच्या आधारे प्राप्तिकरात सवलत मिळते. परंतु नव्या टॅक्स स्लॅबचा फायदा घ्यायचा असल्यास त्यांना या सवलतीवर पाणी सोडावं लागेल. याआधी प्राप्तिकर भरताना या सगळ्या गोष्टींची माहिती दिल्यावर करात सवलत मिळत होती.

 

Web Title:  Union Budget 2020 declared by Finance Minister Nirmala Sitharaman has many confusion about tax slabs old and new tax slab.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या