18 January 2025 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

महाराष्ट्राला केंद्राकडून GST परताव्याचे १९ हजार २३३ कोटी रूपये मिळाले

Union Finance ministry, GST returns, Maharashtra

नवी दिल्ली, २८ जुलै : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारडून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारचा महाराष्ट्राला जीएसटी परतावा जाहीर करण्यात आलायं. जीएसटी परताव्याचे महाराष्ट्राला १९ हजार २३३ कोटी रूपये देण्यात येत आहेत. २०१९-२० चा हा जीएसटी परतावा देण्यात आलाय.

देशात सर्वाधिक मदत महाराष्ट्राला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण १ लाख ६५ हजार कोटींचा परतावा देण्यात आलाय. केंद्राकडून आलेल्या परिपत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन कोरोना संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांसंदर्भात माहिती दिलीय. यामध्ये महाराष्ट्र, युपी आणि बंगालमध्ये टेस्टिंग क्षमता १० हजारांनी वाढवत असल्याचे ते म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारकडून केंद्राकडे जीएसटी परतावा देण्याची मागणी होत होती, अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत केंद्र सरकारला पत्रही लिहिलं होतं, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता, त्यामुळे जीएसटी परताव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राला केंद्राकडून १९ हजार २३३ कोटी इतकी भरघोस रक्कम मिळाली आहे.

 

News English Summary: Central Government announces GST refund to Maharashtra. Maharashtra is being given Rs 19,233 crore for GST refund. This GST refund for 2019-20 has been given.

News English Title: Union Finance ministry give 19 thousand GST returns to Maharashtra News latest Updates.

हॅशटॅग्स

#GST(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x