22 February 2025 7:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

५० हजार कोटीं खर्चून समुद्रमार्गे मुंबई-दिल्ली हायवे वरळी सी-लिंकला जोडणार - नितीन गडकरी

Nitin Gadkari

मुंबई, १२ ऑगस्ट | नगरकरांबरोबरच औरंगाबादकरांचाही पुणे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. अहमदनगरमधून थेट पुण्यापर्यंत १०० किमीचा ३ मजली उड्डाणपूल तयार होणार असून त्याच्या आराखड्याला मंजुरीही मिळाली आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच तीनमजली पूल असणार आहे. त्यासाठी प्राथमिक सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत खासगी संस्थेला देण्यात येणार आहे.

अहवालानंतर निविदा प्रक्रियेला वेग येईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत भाजपच्या शिष्टमंडळातील नगरचे माजी पालकमंत्री राम शिंदे, भाजपचे माजी गटनेते सुवेंद्र गांधी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिले. औरंगाबाद-नगर-पुणे हा चौपदरी रस्ता नेहमीच वर्दळीचा राहतो. नगर शहर, शिरूर-वाघोली या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. ती कमी करण्यासाठी नगर बाह्यवळण रस्ता ते चंदननगर हा १०० किमीचा तीन मजली उड्डाणपूल तयार होणार आहे. त्यावर ७,२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

नगरच्या बायपासपासून ते चंदननगरपर्यंत पूल:
अहमदनगर शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्यापासून या तीनमजली उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. नगर बाह्यवळण रस्ता ते वाघोलीमार्गे चंदननगरपर्यंत आहे. त्याच रस्त्यावर ७,२०० कोटी रुपये खर्च करून केंद्र सरकार हा पूल उभारणार आहे.

औरंगाबादकरांची ३० मिनिटे वाचणार:
नगर शहरातील उड्डाणपुलाचे ५५% काम झाले आहे. मे २०२२ पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्यांचा नगर शहरातील कोठला, चांदणी चौक, स्वस्तिक चौक या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बराच कालावधी जायचा. नव्या उड्डाणपुलामुळे औरंगाबादकरांची ३० मिनिटे वाचणार आहेत.

प्राथमिक अहवालानंतर नकाशे तयार केले जाणार:
खासगी संस्थेकडून या प्रस्तावित तीनमजली उड्डाणपुलाचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर त्याच्यावर अभ्यास करून केंद्र सरकार नकाशे तयार करणार आहे. यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाईल. २०२२ अखेरपर्यंत ती पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल, असा अंदाज आहे.

मुंबई-दिल्ली हायवे वरळी सी-लिंकला जोडणार:
मुंबई-दिल्ली हायवे वरळी सी-लिंकला जोडणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. दिल्ली-मुंबई हायवेला वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न असून त्यासाठी ५० हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

“मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, वरळी-वांद्रे सी लिंक, ५५ उड्डाणपूल अशी अनेक काम केलं. त्या काळात बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नारायण राणे असे सर्वजण होते. पण एक गोष्ट राहून गेली. मला वरळी-वांद्रे सी लिंक वसई विरारच्या पलीकडे नेऊन दिल्ली-मुंबई हायवेला जोडायचा होता. आता मी दिल्ली-मुंबई हायवे एक लाख कोटींचा बांधत असून तो जेएनपीटीपर्यंत आहे. त्याचं ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. त्या हायवेला वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचं माझं स्वप्न आहे. त्यासाठी ५० हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union Minister Nitin Gadkari Bandra Worli Sea Link Delhi Mumbai Highway news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x