ट्रॅक्टरच्या गाद्याच सोडा, ८००० कोटीच्या विमानातील ५० पलंगांवर सुद्धा बोला | सणसणीत टोला

नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सध्या कृषी कायद्याविरोधात पंजाबमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेत. यावेळी, ट्रॅक्टरवर एका कुशन लावलेल्या खुर्चीवर ते बसलेले काही फोटो समोर आले होते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यावर बोट ठेवत सोमवारी राहुल गांधी यांना ‘व्हीआयपी शेतकरी’ म्हणत टीकाही केली होती. यालाच आज पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. ‘गाद्यांची गोष्ट करणारे ८००० कोटी रुपयांच्या विमानात गप्प का आहेत? त्या विमानात गाद्याच नाहीत तर ५० पलंग आहेत’ असं म्हणत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.
‘हा प्रश्न कधीही विचारला जाणार नाही की नरेंद्र मोदी यांनी ८००० कोटींचे विमानं का खरेदी केले? त्यामध्ये गाद्याच नाहीत तर पलंग आहेत. एक नाही तर ५० पलंग असतील त्यात, हे ते कधीच विचारणार नाहीत की आमच्या पंतप्रधानांनी ८००० कोटींचं विमान खरेदी केलं, का तर त्यांचे मित्र ट्रम्प यांच्याकडे ८००० कोटींचं विमान आहे तर मग यांनाही हवंय, पण हे मात्र नक्कीच म्हणतील की राहुल गांधी, अमरिंदर सिंह गेले, ट्रॅक्टरवर बसले होते आणि कुणीतरी कुशन त्याला लावलं’ असं यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलंय.
गद्दे की बात करने वाले 8000 करोड़ के जहाज पर चुप क्यों हैं? उस जहाज में गद्दा छोड़िए, पलंग है। 50 पलंग हैं।#किसान_न्याय_यात्रा pic.twitter.com/zuxKY0LM2x
— Congress (@INCIndia) October 6, 2020
राहुल गांधी ‘शेती वाचवा यात्रा’ आंदोलनात ते ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झाले होते. यावर २०१९ साली लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीतून पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांनी टीका केली होती. ‘ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात. त्यांच्याप्रमाणेच व्हीआयपी शेतकरी कधीही त्या प्रणालीचं समर्थन करणार नाहीत ते छोट्या शेतकऱ्यांना दलालांच्या तावडीतून सोडवण्यासाठी तयार करण्यात आलेत’ असं स्मृती इराणी यांनी म्हटलं होतं.
न्याय का ये कारवां न रुका है और न रुकेगा।
किसान हितों के लिए हर कांग्रेसी लड़ेगा।।#किसान_न्याय_यात्रा pic.twitter.com/Bp3ilgl5Iy— Congress (@INCIndia) October 6, 2020
News English Summary: A special Air India One aircraft built in America for the Prime Minister and President of the country has arrived in India on Thursday, October 1. Two high-tech aircraft of ‘Air India One’ landed at Delhi Airport today. The two VVIP aircraft have already taken flight tests at its Boeing headquarters in Chicago. Teams of Air India engineers and pilots of the Indian Air Force fly the Boeing-777 equipped with both missile defence systems from the US. Although Air India would receive the plane, it will be operated by IAF. It has its own missile defence system, called the Large Aircraft Infrared Countermeasures (LAIRCM) and Self-Protection Suites (SPS) besides the state-of-the-art communication system.
News English Title: Union Minister Smriti Irani Vs Rahul Gandhi Rahul Gandhi used sofa seat in on tractor Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC