20 April 2025 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON
x

संताप जनक वक्तव्य, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले तरी सामान्यांवर काही प्रभाव पडत नाही - पेट्रोलियममंत्री

Union Petroleum Minister, Dharmendra Pradhan, Petrol Diesel Price

नवी दिल्ली, १ जुलै : सध्या दोन्ही इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. डिझेल 13 पैशांनी महागले असून, पेट्रोलची किंमतही 5 पैशांनी वाढली आहे. या महिन्यात सलग 21 दिवस इंधनाच्या दरात वाढ झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी दरवाढ केली नव्हती. पण आज सोमवारी पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. कालच्या 80.38 रुपयांच्या तुलनेत दिल्लीत पेट्रोलचे दर 5 पैशांनी वाढून 80.43 रुपये झाले आहेत. डिझेलही 13 पैशांनी वाढून त्याचा भाव 80.53 रुपयांवर पोहोचला आहे. काल दिल्लीत डिझेलची किंमत 80.40 रुपये होती. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली हे देशातील पहिले राज्य बनले आहे, जेथे पेट्रोलपेक्षा डिझेल महाग आहे.

सध्या वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतीने सामान्य जनता देखील प्रचंड त्रस्त आहे आणि दुसरा परिणाम असा झाला आहे की त्यामुळे महागाई देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना आणि सामान्य माणसाचा खिसा चारही बाजूंनी रिकामा होतो आहे. त्यात केंद्र सरकारकडून उपाय होतं नसला तरी केंद्रातील मंत्री मंत्री देत असलेल्या प्रतिक्रियेतून संताप वाढण्याची शक्यता आहे.

केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने त्याचा सर्वसामान्यांवर काही प्रभाव पडत नाही असं म्हटलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे. इंधनाच्या दरात सतत वाढत होत असून गेल्या २३ दिवसात २२ वेळा दर वाढले आहेत. यामुळे काँग्रेसकडून अनेक राज्यांमध्ये आंदोलनही केलं जात आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी इंधनाच्या वाढत्या दरांचं समर्थन करताना म्हटलं की, “जागतिक स्तरावरही खूप मोठी आव्हानं उभी राहिली आहेत. यामुळे जगभरात इंधनाच्या मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. लॉकडाउनमुळे एप्रिल आणि मे महिन्यात इंधनाच्या मागणीत ७० टक्के घट झाली आहे. पण आता अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे मागणी होत आहे”.

अशा परिस्थितीतत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराचा प्रभाव सर्वसामान्यांवर पडलेला नाही असं धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितलं. “जेव्हा कुटुंबात एखादी समस्या येते तेव्हा भविष्यातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आर्थिक नियोजन केलं जातं. इंधनाच्या वाढत्या दराकडे तसंच पाहिलं गेलं पाहिजे,” असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Union Petroleum Minister Dharmendra Pradhan has said that the hike in petrol and diesel prices will not affect the common man. The Economic Times reports. Fuel prices have been rising 22 times in the last 23 days.

News English Title: Union Petroleum Minister Dharmendra Pradhan Says Common Man Not Impacted By Rising Petrol Diesel Price News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या