22 February 2025 2:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

FASTag | टोलनाक्यांवरील FASTag साठी मुदतवाढ

Union Road Transport Ministry, Deadline Of Fastag

मुंबई, ३१ डिसेंबर: रस्ते परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल नाक्यांवर फास्‍टॅग अनिवार्य केल्यानंतर आता फास्‍टॅग बनवण्याची शेवटची मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी सरकारने 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र, सरकारने आता ती मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. (Union Road Transport Ministry Has Extended Deadline For Use Of Fastag Till 15th February)

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, वर्तमान काळात राष्ट्रीय महामार्गांवरुन जे टोल मिळतं त्यापैकी 80 टक्के टोल हा फास्‍टॅगच्या मदतीने मिळते. 1 जानेवारी 2021 पासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक असेल, अशी घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी 24 डिसेंबरला केली होती.

FASTag ची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचं इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचतील. फास्टॅग अकाउंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्या संबंधीचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाउंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे.

FASTag साठी आवश्यक कागदपत्रे:

  • वाहनाचं नोंदणीचं पत्र
  • वाहनाच्या मालकाचा फोटो
  • KYCसाठी आवश्यक कागदपत्र
  • वास्तव्याचा दाखला

 

News English Summary: The deadline for making fast tags has now been extended to February 15, 2021, after the Ministry of Road Transport made fast tags mandatory at toll plazas on national highways. Earlier, the government had made FASTag mandatory for all four-wheelers from January 1, 2021. However, the government has now extended the deadline to February 15.

News English Title: Union Road Transport Ministry Has Extended Deadline For Use Of Fastag Till 15th February news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Toll Cha Zol(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x