22 January 2025 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

पंकजा मुंडेचं वर्चस्व असलेल्या बँकेच्या चेअरमनला लाच घेताना अटक

Vaidyanath Bank, Chairman Ashok Jain, Taking bribe, Anti Corruption

बीड, १९ ऑक्टोबर : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मागील 2 वर्षापासून गाजत असलेल्या वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना तब्बल दहा लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज अशोक जैन यांच्या परळी येथील राहत्या घरी करण्यात आली. औरंगाबाद लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड टाकली तेव्हा हा संपूर्ण प्रकार उजेडात आला.

वैद्यनाथ बँकेने कळंब येथील बँकेच्या एका सभासदाला अंदाजे अडीच कोटी रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर केले असल्याचे समजते. आणि त्या प्रकरणी चेअरमन अशोक जैन यांनी 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी याप्रकरणी औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर आज 15 लाखाच्या रक्कमेपैकी 10 लाख रुपये आज दुपारी दोनच्या सुमारास अशोक जैन यांच्या निवासस्थानी देण्याचे ठरले होते.

ठरलेल्या वेळेनुसार, तक्रारदार 10 लाखांची रक्कम घेऊन अशोक जैन यांच्या घरी पोहोचला. त्यावेळी औरंगाबाद येथील लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. यावेळी 10 लाखांची लाच घेत असताना अशोक जैन यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वैद्यनाथ सहकारी बँकही भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे.

 

News English Summary: Ashok Jain, chairman of Vaidyanath Bank, who has been involved in corruption cases for the last two years, has been caught red-handed by the bribery department while accepting a bribe of Rs 10 lakh. The incident has caused a stir in the state, including Beed district. The operation was carried out at Ashok Jain’s residence in Parli today. The whole thing came to light when the Aurangabad Bribery and Corruption Department officials set a trap.

News English Title: Vaidyanath Bank Chairman Ashok Jain caught red handed taking bribe of rupees 10 lakhs in Beed News updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x