20 November 2024 11:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Family Pension | मुलींनो कौटुंबिक पेन्शनवर तुमचा सुद्धा हक्क; निवृत्ती वेतनाबाबतचे नियम लक्षात ठेवा, आजीवन पेन्शन मिळेल Home Loan Vs SIP | घर खरेदीसाठी लोन की SIP फायदेशीर, हा फॉर्म्युला वापरून घराचं स्वप्न करता येईल साकार - Marathi News IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीटसोबत प्रवाशांना मोफत मिळतात या 5 सुविधा Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत फायद्याची अपडेट, 3892% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार - NSE: TATAPOWER RattanIndia Enterprises Share Price | शेअर प्राईस 66 रुपये, 1018% परतावा देणारा शेअर पुन्हा तेजीत - NSE: RTNINDIA NBCC Share Price | 263% परतावा देणारा NBCC शेअर पुन्हा मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NBCC
x

पुन्हा मतपत्रिकांच्या युगात नेणार नाही : मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली : लंडनमधील हॅकेथॉनमध्ये सय्यद शुजा नामक हॅकरने ईव्हीएम हॅकिंगबाबत केलेल्या धक्कादायक दाव्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, ईव्हीएम’वरून देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी आगामी निवडणुका या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमांतूनच पार पडतील हे स्पष्ट केले आहे. देशाला पुन्हा मतपत्रिकांच्या युगात घेऊन जाण्याचा आमचा विचार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान ‘आपण यापुढे सुद्धा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करणे सुरुच ठेवणार आहोत. त्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून आणि उमेदवारांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आम्ही सुद्धा सज्ज आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी आम्ही मतदानासाठी जुन्या मतपत्रिकांचा वापर करण्याचा आग्रह धरणाऱ्या मागण्यांपुढे आम्ही झुकणार नाही’ असे सुद्धा सुनील अरोरा यांनी स्पष्ट सांगितले आहे.

हॅशटॅग्स

#EVM Machine(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x