नोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं? - वाचा अन्यथा
मुंबई, १३ जुलै | PF हा प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी रिटायरमेंट फंड असतो त्याच्यामध्ये निवृत्तीनंतर आर्थिक पुंजीची ठेव असते. आता नोकरदार व्यक्तींसाठी पीएफ अकाऊंटसमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. तुमच्या पीएफ अकाऊंट्सचा पूर्णपणे फायदा मिळवता यावा यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळणं गरजेचे आहे. तुम्ही निवृत्त होत असाल किंवा नोकरी बदलत असाल तर विशेष दक्ष राहणं गरजेचे आहे नोकरी बदलताना अनेक नोकरदार एक चूक करतात ती म्हणजे नोकरी बदलताना अकाऊंट ट्रान्सफर न करणं. मग पहा तुम्ही 58 वर्षांपूर्वी निवृत्ती घेण्याचा किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्या पीएफ अकाऊंट सोबत काय होतं?
नोकरी सोडल्यानंतर तुमच्या ईपीएफ अकाऊंट सोबत काय होतं?
* सध्याच्या नियमांनुसार, तुमची नोकरी सोडली आणि तुमच्या अकाऊंटमध्ये कोनतीही नवी कॉट्रिब्युशन होत नसतील तरीही त्यावर व्याज दिले जाते पण हे केवळ वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत असेल.
* तुमच्या पीएफ अकाऊंट मधील रक्कम वयाच्या 58व्या वर्षापर्यंत किंवा नोकरी सोडत नाही तो पर्यंतच टॅक्स फ्री असते.
* इन्कम टॅक्सच्या नियमावलीनुसार, तुमच्या पीएफ अकाऊंट मधील रक्कम जर तुम्ही सलग 5 वर्ष कामाच्या आधीच काढली तर तुम्हांला त्यावर टॅक्स द्यावा लागू शकतो.
* पहिल्या 5 वर्षांमध्ये एखाद्याने विविध कंपन्यांसोबत काम केले असेल आणि पीएफ अकाऊंट पुढील कंपनीसाठी ट्रान्सफर केले असेल तर तो नोकरीचा काळ हा ‘सलग’ मानला जातो.
कोणत्या गोष्टींचं भान ठेवणं अत्यावश्यक?
* तुमच्या पीएफ अकाऊंट्सचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर तुम्हांला नोकरी बदलल्यानंतर ती अकाऊंट्स शक्य तितक्या लवकर ट्रांसफर करणं आवश्यक आहे.
* अनेक अकाऊंट्स असतील तर ती सारख्याच UAN नंबर सोबत जोडलेली असणं आवश्यक आहे.
* तुम्ही 58 वयाच्या पूर्वी निवृत्त होणार असाल तर तुम्हांला निवृत्तीच्या 36 महिन्यांतच अकाऊंटमधील पैसे काढणं आवश्यक आहे.
PF अकाऊंट्स इनअॅक्टिव्ह कधी होऊ शकतात?
* 55 वर्षांच्या नोकरीनंतर 3 वर्षांत नोकरदार व्यक्तीने त्यांचे पैसे पीएफ अकाऊंट मधून न काढल्यास
* ईपीएफ अकाऊंट होल्डर दुसर्या देशात कायमचा स्थलांतरित झाल्यास
* पीएफ अकाऊंट होल्डरचं निधन झाल्यास
* नोकरी सोडल्यानंतर 36 महिन्यात संबंधित व्यक्तीने अकाऊंट सेटलमेंट्स साठी अर्ज न केल्यास किंवा पैसे काढण्यासाठी अर्ज न केल्यास अकाऊंट टर्मिनेट केलं जाऊ शकतं.
* PF चा व्याजदर आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.50 टक्क्यांवर कायम आहे. मागील वर्षभर कोरोना संकटामुळे अर्थ व्यवस्था गडगडल्याने आणि नोकर्यांवरही त्याचा परिणाम झाल्याने या वर्षी व्याजदर कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र व्याजदर कायम ठेवण्यात आले आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: What happens to your EPF account after leaving the job of salaried person news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Post Office Schemes | दररोज 100 रुपये वाचवून पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा, मिळेल लाखो रुपयात परतावा
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL