मृत्यूपत्र बनविण्याबद्दल तुम्हाला काय माहिती असावे? | वाचा आणि लक्षात ठेवा

मुंबई, ०९ जुलै | एक जुनी म्हण आहे: जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. योग्य पद्धतीने अंमलात आणलेले मृत्यूपत्र नसल्यास पुढे जाण्याचे अनेक मार्ग असतात, पण ते सगळे अवघड असतात. बिरला परिवार, रॅनबॅक्सी परिवार, अंबानी बंधु किंवा आपल्या शेजारच्या काकांना सुद्धा विचारून बघा. सगळ्यांचे एकच मत असेल की वारसा मिळविण्याच्या रस्त्यावर मृत्युपत्राच्या अनेक कथा असतात. तरीही, भारतात अजूनही ‘मृत्यूपत्र व्यवस्थापन’ हा आर्थिक व्यवस्थापनाचा भाग समजला जात नाही. पण मृत्यूपत्राचे महत्व किंवा त्याच्या व्यवस्थापनाबद्दल बोलण्याआधी आपण हे जाणून घेऊ की मृत्यूपत्र म्हणजे नेमके काय असते?
मृत्यूपत्र म्हणजे काय?
हे एक कायदेशीर दस्तऐवज असते ज्यात एखाद्या व्यक्तिच्या मृत्यू नंतर त्याची/तिची मालमत्ता आणि संपत्ती ज्या व्यक्तिला मिळणार असते त्याचे/त्यांचे नाव असते. जी व्यक्ती हे दस्तऐवज कार्यान्वित करते, ती जीवंत असे पर्यन्त ती हे दस्तऐवज मागे घेऊ शकते, बदलू शकते, किंवा त्याच्या जागी दुसरे निर्माण करू शकते.
मृत्यूपत्र नियोजनाचे महत्व:
मृत्यूपत्र नियोजन महत्वाचे आहे कारण हे दस्तऐवज मृत माणसाच्या संपत्तीचा गोषवारा असते. स्पष्ट आणि योग्य रीतीने लिहिलेल्या मृत्यूपत्रामुळे नैसर्गिक वारसांमध्ये ताण तणाव टळते. आणि, जर एखाद्या व्यक्तिला आपली संपती नैसर्गिक वारसांव्यतिरिक्त अजून कोणाला द्यायची असल्यास मृत्यूपत्राचे महत्व सगळ्यात अधिक असते.
मृत्यूपत्र कोण बनवू शकतो?
कुठलीही व्यक्ती जी संतुलित मन:स्थितीत आहे, सज्ञान आहे ती मृत्यूपत्राच्या मदतीने आपली संपत्ती कोणाच्या नावे ठेवून जाऊ शकते. अंध, मूक, किंवा बहिर्या व्यक्तिंना जर त्यांच्या कार्याचे परिणाम आणि कायदेशीर परिणाम समजत असतील तर ते सुद्धा मृत्यूपत्र बनवू शकतात. सामान्यपणे असंतुलित असलेला मनुष्य मृत्यूपत्र बनवू शकतो जेव्हा तो संतुलित स्थितीत असेल. मात्र, जर एखाद्या व्यक्तिला आपण काय करतो आहोत हे कळत नसेल, तर अशा मन:स्थितीत ती व्यक्ती मृत्यूपत्र बनवू शकत नाही.
मृत्यूपत्र नोंदणीकृत करणे:
मृत्यूपत्र साध्या कागदावर पण कार्यान्वित केली जाऊ शकते आणि नोंदणी झाली नाही तरी त्याला मूल्य असते, म्हणजे कायद्याप्रमाणे नोंदणी करणे अनिवार्य नाही. पण त्याच्या खरेपणावर कोणी शंका घेऊ नये म्हणून तुम्ही त्याला नोंदणीकृत करू शकता.
जर तुम्हाला तुमचे मृत्यूपत्र नोंदणीकृत करून हवे असेल, तर तुम्हाला साक्षीदारांसह उप-निबंधकाच्या कार्यालयात जावे लागते. त्यासाठी विविध जिल्ह्यात उप-निबंधक असतात आणि संबंधित कार्यालयात चौकशी करून कोण आपल्याला मदत करेल हे शोधावे लागते.
कायदेशीर पुरावा:
एकदा मृत्यूपत्र नोंदणीकृत झाले की मग ते सबळ कायदेशीर पुरावा म्हणून वापरता येते. हे लिखित असले पाहिजे, ज्यात नमूद असले पाहिजे की मृत्यूपत्र लिहिणारा स्वच्छेने आणि संतुलित मन:स्थितीत असताना लिहितो आहे. त्याची सही असावी लागते आणि त्यावर कमीत कमी दोन साक्षीदारांच्या सह्या असाव्या लागतात. मृत्युपत्रावर मुद्रांक शुल्क द्यावे लागत नाही, म्हणून ते मुद्रांक कागदावर लिहिण्याची गरज नाही.
मृत्यूपत्रांचे प्रकार:
दोन प्रकारचे मृत्यूपत्र असतात: विशेषाधिकार असलेले आणि नसलेले. विशेषाधिकार असलेले मृत्यूपत्र हे मोहिमेवर किंवा प्रत्यक्ष युद्धात असलेले सैनिक किंवा वैमानिक किंवा खलाशी ह्यांचे अनौपचारिक मृत्यूपत्र असते. इतर सर्व मृत्यूपत्र ह्यांना विशेषाधिकार नसलेले मृत्यूपत्र म्हणतात. पहिल्या प्रकारचे मृत्यूपत्र तोंडी किंवा लिखित असू शकते आणि आपले आयुष्य धोक्यात टाकणार्या व्यक्ती हे शेवटच्या क्षणी बनवितात, दुसर्या प्रकारच्या मृत्यूपत्रासाठी सर्व औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात.
मृत्यूपत्र करणार्याची सही:
विशेषाधिकार नसलेल्या मृत्युपत्रासाठी मृत्यूपत्र करणार्या व्यक्तिची सही किंवा शिक्का असणे अनिवार्य असते. काही परिस्थितीत जर मृत्यूपत्र करणार्या व्यक्तिला शारीरिक रित्या शक्य नसेल तर त्याच्या उपस्थितीत दुसर्या व्यक्तिला सही करता येते. काही राज्यांमध्ये मृत्यूपत्र करणार्या व्यक्तिशिवाय इतरांना त्यावर सही करता येते, मात्र हे मृत्यूपत्र करणार्याच्या निर्देशावर आणि संमतीने असावे. पण, भविष्यात काही वाद टाळण्यासाठी मृत्यूपत्र करणार्यानी सही करणे योग्य असते. विशेषाधिकार नसलेल्या मृत्युपत्रावर कमीत कमी दोन साक्षीदारांची सही लागते ज्यांनी प्रत्यक्ष मृत्यूपत्र करणार्याला मृत्युपत्रावर सही करताना बघितले आहे. साक्षीदाराने इतर साक्षीदाराच्या उपस्थितीत सही करणे आवश्यक नाही.
मृत्यूपत्र सुरक्षित ठेवणे:
भारतीय नोंदणी कायदा १९०८ अंतर्गत मृत्यूपत्र सुरक्षित ठेवण्याची तरतूद आहे. मृत्यूपत्र असलेले सील बंद पाकीट, त्यावर मृत्यूपत्र करणार्याचे नाव किंवा त्याच्या एजेंटचे नाव लिहून कुठल्याही निबंधकाकडे सुरक्षित ठेवण्यासाठी देता येते.
साक्षीदाराची कायदेशीर मान्यता:
मृत्यूपत्र वैध मानल्या जाण्यासाठी, मृत्युपत्रातील लाभार्थी साक्षीदार असू शकत नाही.
मृत्यूपत्र रद्द करणे:
स्वेच्छेने किंवा इतर परिस्थितीत मृत्यूपत्र रद्द करता येते. कायदेशीर रित्या गरज असल्यास मृत्यूपत्र रद्द करता येते. जर मृत्यूपत्र लिहिणार्या व्यक्तिचे लग्न झाले तर ते मृत्यूपत्र आपोआप रद्द होते. लिहिणार्याचे फक्त पहिलेच नाही तर नंतर होणार्या कुठल्याही लग्नानंतर मृत्यूपत्र रद्द होते. आपण हव्या तितक्या वेळा मृत्यूपत्र बनवू शकतो पण मृत्यूपूर्वी केलेले शेवटचे मृत्यूपत्र अंमलात आणले जाते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: What is Will and testament in family details in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL