19 April 2025 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

महिलांसाठी घरबसल्या कमाईचे हे ५ सुलभ मार्ग | नक्की वाचा आणि शेअर करा

Home earning for Women

मुंबई, 20 जून | लग्नानंतर कुटुंबियांची इच्छा नसल्याने अथवा बाळंतपणानंतर मुलांच्या जबाबदारीमुळे महिलांना नोकरी करणे शक्य होत नाही. मात्र सध्याच्या काळात मर्यादित उत्पन्नावर घर चालविणे मुश्कील होत आहे. त्यावेळी कमावत्या व्यक्तीला हातभार लावण्यासाठी घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून चांगली कमाई करण्याचे अनेक मार्ग आता उपलब्ध आहेत.

मेस अथवा टिफीन:
बहुतेक स्त्रिया या स्वयंपाक करण्यात निपुण असतात. अशा महिला टिफीनचा अथवा जागा असल्यास मेस चालविण्याचा व्यवसाय सुरु करु शकतात. जे लोक कामानिमित्त अथवा शिक्षणासाठी घरापासून दूर राहतात अशा नोकरदारांना आणि विद्यार्थ्यांना टिफीन अथवा मेस सेवा देऊ शकतात

फ्रीलान्स रायटींग:
ज्या महिलांना लिखाणाची आवड असेल, शैली असेल, चांगले लिहू शकत असतील तर त्या फ्रीलान्स लेखन करू शकतात. एखाद्या वर्तमानपत्राने किंवा मॅगझिनने लिखाण प्रसिद्ध करून एका लेखाला कमीत कमी २०० रुपये दिले; आणि दिवसभरात ३ लेख जरी लिहीता आले; तरी दरमहा १५ ते १८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल.

मेकअप, ब्युटीशियन:
मेकअप आणि ब्युटी पार्लरची आवड बहुतेक महिलांना असते आणि त्यांना त्यासार्भात ज्ञानही सहज मिळते. अल्पवाधीचे प्रशिक्षण, थोडेसे भांडवल आणि कल्पकता या भांडवलावर हा व्यवसाय करता येतो.

शिकवणी:
सर्वसाधारणपणे पदवी किंवा समकक्ष शिक्षण घेतलेल्या, समजावून देण्याची क्षमता आणि न रागावता मुलांना समजेपर्यंत समजावून देण्याचा पेशन्स असलेल्या महिला घरातच अथवा छोट्याश्या जागेत शिकवणी, अर्थात ट्युशन घेऊ शकतात. आपले ज्ञान इतरांना दिल्याने ते कमी न होता वाढते. अद्ययावत राहते. याशिवाय त्यापासून चांगले उत्पन्नही मिळू शकते. अर्थात हा पर्याय केवळ महिलांनाच नव्हे; तर पुरुषांनाही उपयुक्त आहे.

छंद वर्ग:
अनेक महिलांना विद्यार्थी दशेपासून शिवण, वीणकाम, रुटीनपेक्षा वेगळ्या प्रकारचे नावीन्यपूर्ण पदार्थ बनविणे, चित्रकला, बोन्साय, संगीत, नृत्य अशा अनेक प्रकारचे छंद जोपासणे आवडते. त्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ही कला इतरांना शिकविणे हा मोठा व्यवसाय होऊ शकतो. अशा व्यवसायाने आपला छंद जोपासण्याची संधी, जोडीला आकर्षक कमाई आणि इतरांना या कलेचे प्रशिक्षण देऊन कलेची सेवा केल्याचे समाधान; असा तिहेरी फायदा मिळू शकतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Women can earn through these 5 ways from home news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Business(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या