17 April 2025 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

अ‍ॅमेझॉन अ‍ॅकॅडमी | E-learning Entry | JEE ते स्पर्धा परीक्षांची ऑनलाईन तयारी

Amazon academy, Online coaching classes, JEE, Competitive exams

मुंबई, १४ जानेवारी: अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी, अ‍ॅमेझॉन इंडियाने अ‍ॅमेझॉन अ‍ॅकॅडमी सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण सामग्री, लाइव्ह लेक्चरद्वारे जेईईसाठी नियमित तयारी करवून घेतली जाईल. तसेच गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचे विस्तृत मूल्यांकन उपलब्ध करुन दिले जाईल. अ‍ॅमेझॉन अ‍ॅकॅडमीची बीटा आवृत्ती व्हीबँड आणि गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध असेल.

निवेदनात पुढे म्हटले आहे की अ‍ॅमेझॉन अ‍ॅकॅडमी विद्यार्थ्यांना जेईईच्या तयारीशी संबंधित संसाधने प्रदान करेल. त्यांना तज्ञांनी तयार केलेले 15,000 हून अधिक प्रश्न उत्तरांसह प्रदान केले जातील. ही सर्व शिक्षण सामग्री आणि परीक्षेची सामग्री देशभरातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी विकसित केली आहे. जेईईबरोबरच, BITSAT, VITEEE, SRMJEEE आणि MET तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या उपलब्ध कंटेंटचा फायदा होईल.

मॉक टेस्टमध्ये चॅप्टर टेस्ट, पार्ट टेस्ट आणि फुल टेस्ट समाविष्ट आहे, जे जेईई पॅटर्नचे अनुसरण करते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षेची तयारी करण्यास मदत मिळणार आहे. या चाचण्या खास जेईईची समज आणि अनुभव देण्यासाठी तयार केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचे बारकावे समजण्यास मदत होते.

अमेझॉन अकॅडमीचे हे स्टडी मटेरियल विदयार्थ्यांसाठी सध्या मोफत उपलब्ध होत असून पुढील काही महिन्यांपर्यंत हे मोफत असेल असेही कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलंय. अमेझॉन अकॅडमीने या संबंधी एक निवेदन प्रसिध्द केलं असून त्यात म्हंटलं आहे की, “उच्च गुणवत्तापूर्ण आणि सर्वांना परवडेल अशा शिक्षणाचा प्रसार करणे हे अमेझॉनचे ध्येय आहे. सध्या केवळ जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे पण भविष्यात इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अमेझॉन इंडिया सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.”

 

News English Summary: To help students prepare for the joint entrance exam for admission to engineering colleges, Amazon India has announced the launch of Amazon Academy. The company said in a statement that through this online platform, students will be regularly prepared for JEE through educational materials, live lectures. Detailed assessments in Mathematics, Physics and Chemistry will also be provided. The beta version of Amazon Academy will be available for free on Viband and Google Play Store.

News English Title: Amazon academy entry in coaching classes for students to preparing for JEE and other competitive exams news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या