21 April 2025 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
x

मुंबईत १६२ खासगी इंग्रजी शाळा बेकायदा | ऍडमिशन पूर्वी माहिती घ्या

BMC, 206 illegal schools, Mumbai city

मुंबई, ५ जानेवारी: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील २०६ बेकायदा शाळांची यादी नुकतीच जाहीर केली. इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक १६२ बेकायदा शाळा असल्याचे उघडकीस आले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते. त्यामुळे पालकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. बेकायदा शाळा तातडीने बंद करा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी सूचना पालिकेने शाळा प्रशासनाला दिली आहे.

त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी योग्य ती कागदपत्रे तपासा, असे आवाहन पालिकेने केले आहे. यातील बहुतांश शाळा या पूर्व आणि उत्तर मुंबईतील आहेत. ६७ शाळा एम वॉर्ड म्हणजे मानखुर्द, गोवंडी परिसरातील आहेत. तर उर्वरित शाळा या मालाड, मालवणी, घाटकोपर आणि भांडुप परिसरातील आहेत. या शाळा बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. यामुळे पालकांनी अशा शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेची मान्यता बंधनकारक आहे. ही मान्यता न घेताच अनेक संस्थाचालकांनी झोपडपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात शाळा सुरू केल्या आहेत. सरकारी नियम धाब्यावर बसविणार्‍या शाळा व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. अनधिकृत शाळा व्यवस्थापनांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळील महापालिकेच्या किंवा मान्यताप्राप्त खासगी शाळेत पुढील शिक्षणासाठी दाखल करावे, अशा सूचना शिक्षणाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

माध्यमनिहाय शाळा:

  • इंग्रजी – १६२
  • उर्दू – १६
  • हिंदी – १५
  • मराठी – १३

 

News English Summary: The Mumbai Municipal Corporation’s education department recently released a list of 206 illegal schools in the city. The highest number of 162 illegal English medium schools has been revealed. Parents struggle to get students admitted to English medium schools. So parents are more likely to be deceived. The municipality has instructed the school administration to close the illegal schools immediately or else punitive action will be taken.

News English Title: BMC declared 206 illegal schools in the Mumbai city news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या