19 April 2025 1:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

SSC निकाल झाला | 11'वी प्रवेशासाठी CET परीक्षेची तारीख जाहीर | प्रवेश प्रक्रिया कशी असेल?

CET examination

मुंबई, १९ जुलै | इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता 11 वी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाईल, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे 10वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता सीईटीसाठी तयारीला लागण्याची गरज आहे.

अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असेल?
* अकरावीची प्रवेशासाठी CET परीक्षा
* इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा
* प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
* गुण – 100
* बहुपर्यायी प्रश्न
* परीक्षा OMR पद्धतीने
* परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी
* कॉलेजमध्ये प्रवेशाचे निकष काय?
* CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश
* CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य
* त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश
* CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता 10 वीच्या पद्धतीनुसार

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: CET examination date for 11th standard admission is announced news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Education(85)#SSC(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या