15 November 2024 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला | विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही

Cyber attack, Mumbai university server, Minister Uday Samant

मुंबई, ७ ऑक्टोबर : अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचे यात कोणतही नुकसान होणार नाही. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आला आहे, अशी माहिती कुलगुरू आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. असे असले तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.

परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचं यात कोणतही नुकसान होणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी विशेष गट कार्यरत आहे. तर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाल्याची माहिती मुंबई विद्यापाठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी दिल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान ही यंत्रणा कोलमडून टाकण्यासाठी यंत्रणा कार्यरत असून त्याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती देखील यावेळी उदय सामंत यांनी दिली. शिवाय, विरोधकांना काहीही काम नसून परिक्षांबाबत समस्या येत असली तरी याबाबत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे देखील यावेळी उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

News English Summary: For the second day in a row, exams for the distance education wing of the University of Mumbai had to be postponed. In a statement released by the Institute of Distance and Open Learning (IDOL), authorities explained that the technical glitches were a result of a cyberattack on the examination server. Close to 9,000 students of IDOL had their third-year Bachelor of Commerce and Arts exams scheduled, however, more than 90% could not access the exam link on Tuesday.

News English Title: Cyber attack on Mumbai university server students will not be harmed Minister Uday Samant Marathi News LIVE education updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x