28 April 2025 10:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

प्राध्यापिका रोहिणी गोडबोलेंना फ्रान्स सरकारचा मानाचा 'नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट' पुरस्कार

Indian Physicist professor, Rohini Godbole, french order of merit

मुंबई, १४ जानेवारी: फ्रान्स सरकारने भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि प्राध्यातिका रोहिणी गोडबोले यांचा ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट’ हा बहुमानाचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. मूळच्या पुण्याच्या असणार्‍या रोहिणी गोडबोले यांना भारत आणि फ्रान्स यांच्यातील संयुक्त संशोधन प्रकल्पांसोबत मूलभूत विज्ञान संशोधनात महिलांचे प्रमाण वाढावे, यासाठी दिलेल्या योगदानासाठी या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

प्राध्यापिका गोडबोले या पद्मश्री पुरस्कार विजेत्या आहेत. सध्या त्या बेंगळुरू येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधील (आयआयएस्सी) ‘सेंटर फॉर हाय एनर्जी फिजिक्स’मध्ये कार्यरत आहेत. 1995 साली त्यांनी या संस्थेत असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करण्यास सुरू केले. आयआयटी मुंबई मधून मास्टर्स तर theoretical particle physics मध्ये पीएचडी अमेरिकेच्या स्टेट युनिवर्सिटी ऑफ न्यू यॉर्क मध्ये पीएचडी करण्यासाठी गेल्या.

फ्रान्सची राष्ट्रीय संशोधन संस्था असणाऱ्या ‘सीएनआरएस’च्या ‘इंडो-फ्रेंच लॅबोरेटरी इन थिअरॉटिकल हाय एनर्जी फिजिक्स’सोबत त्यांनी मूलभूत संशोधनाचे प्रोजेक्ट्स केले आहेत. ‘सीएनआरएस आणि आयआयएस्सी’च्या संयुक्त संशोधन प्रकल्पांनी मोठे यश देखील संपादन केले आहे.

 

News English Summary: Congratulations to Prof Rohini Godbole (CHEP) on being awarded the Order National du Mérite, among the highest distinctions bestowed by France! She has been recognised for contributions to collaborations b/w France & India and commitment to promoting enrolment of women in science.

News English Title: Indian Physicist professor Rohini Godbole conferred with french order of merit news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या