21 November 2024 6:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News
x

Maharashtra Colleges Reopening | राज्यातील कॉलेज 20 ऑक्टोबरपासून सुरु | दोन्ही कोविड डोस आवश्यक

Maharashtra Colleges Reopening

मुंबई, १३ ऑक्टोबर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॉलेज सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू (Maharashtra Colleges Reopening) होणार असल्याची माहिती दिलीय. विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस आवश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय.

Maharashtra Colleges Reopening. An important decision was taken in the cabinet meeting chaired by Chief Minister Uddhav Thackeray to start the college. Higher and Technical Education Minister Uday Samant informed that the college will start functioning from October 20 :

20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली करण्यात आलीय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री आणि सचिव यांची एक बैठक झाली, या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आलाय. विद्यापीठ महाविद्यालय वर्ग 50% पेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला देण्यात आलेत, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलीय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का हा निर्णय सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असेल. दोन्ही डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्पस घेत लसीकरण करावे, अशा सूचनाही देण्यात आल्यात. विशेष म्हणजे वसतिगृह सुरू करण्याचा आदेशही दिलाय. शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक यांचं लसीकरण पूर्ण झालं पाहिजे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिलीय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Maharashtra Colleges Reopening in Maharashtra from October 20 says minister Uday Samant.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x