16 April 2025 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
x

सकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार

School Reopen

मुंबई, १५ जुलै | राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून(15 जुलै) सुरू होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने याबाबत 5 जुलैला शासन निर्णय जारी केला होता. कोरोनामुक्त ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या परिसरातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग 15 जुलैपासून सुरू होणार आहेत.

सरकारने निर्देशित केलेल्या भागातीलच वर्ग होणार सुरू:
गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. गेल्यावर्षी दिवाळीनंतर शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या होत्या. प्रथमच शालेय शिक्षण विभागाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग काही अटीशर्ती निश्चित करुन २३ नोव्हेंबर, २०२० पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर १८ जानेवारी, २०२१ रोजीच्या इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारी, २०२१ पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, त्यानंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट टप्प्याटप्प्याने वाढत गेली. त्यामुळे राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. पण आता कोरोना संसर्गाची परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणी निवळत असल्याने कोरोनामुक्त गावातल्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे.

वाचा मार्गदर्शक सूचना:
* शाळा सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात येणार आहे. कोरोनासंबंधी नियमांचे पालन करावे लागणार आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आदीचा समावेश आहे.
* सोशल डिस्टन्सिंग पाळल जावे यासाठी एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसता येणार आहे. दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर असायला हवे. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी बसू शकतील. सतत हात साबणाने धुणे, मास्क घालणे हे नियम पाळवे लागणार आहेत.
* कोरोनासंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
* शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावेत. विविध सत्रात वर्ग भरवावेत.
* एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फुट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे.
* संबंधीत शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
* संबंधित शाळेतील शिक्षकाची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये.
* शाळा सुरू करण्यापूर्वी किंवा शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छताविषयक SOP चे पालन करावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra schools to reopen for classes 8 to 12 in no Covid zones starting from today news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Education(85)#School(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या