15 November 2024 5:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

१०'वीच्या विद्यार्थ्यांचा जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात निकाल जाहीर होण्याचे संकेत

SSC Result

मुंबई, 10 जून | शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 28 मे रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत निकष जाहीर केले. त्यानंतर त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. शाळांना शासनानं ठरवून दिलेल्या माध्यमिक शाळांकडून काम सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये जाहीर होणार आहे. शाळांकडून दहावीच्या निकालसंदर्भातील शासन निर्ण्ययानुसार गुण नोंदवण्यात येत असल्याची माहिती आहे.

शासन निर्णयाचे पालन करण्याचे आदेश:
दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या अंतर्गत लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रकल्प आणि नववीच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याच सूत्र निश्चित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं शासन निर्णयाच्या अधीन राहून दहावीचा निकाल वस्तूनिष्ठचं असायला हवा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत. प्रक्रियेचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

राज्य सरकारनं निश्चित केलेल्या निकषाप्रमाणे निकाल जाहीर करावा, अशा सूचना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत. मूल्यमापन पद्धतीच्या नियमांचा भंग केल्यास शाळांवर कारवाई होणार आहे. मुल्यमापनात फेरफार झाल्यास शाळांची मान्यताच होणार रद्द किंवा शाळेचा सांकेतिक क्रमांक बोर्डाकडून काढून घेण्यात येणार आहे.

निकालासाठी नेमली समिती:
दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी शाळास्तरावर समिती स्थापन करावी लागणार आहे. या समितीमध्ये मुख्याध्यापकांसह शाळेतील शिक्षकांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांचा नववीचा निकाल ,दहावीच्या मूल्यमापनाची कागदपत्रे आणि उत्तरपत्रिका निकाल समितीच्या पडताळणीनंतर मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवावे लागणार आहेत. शाळास्तरावर निकालाची तपासणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत होणार आहे.दहावीच्या मूल्यमापनासंदर्भात माध्यमिक बोर्डाकडून शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.

 

News English Summary: School Education Minister Varsha Gaikwad announced the results of the Class X examination on May 28. After that the ruling was issued. The work has been started from the secondary schools decided by the government. According to the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, the results of Class X will be announced in the first fortnight of July. It is known that marks are being registered by the schools as per the government decision regarding the results of class X.

News English Title: Maharashtra SSC Result MSBHSE SSC exam result ma be declare on second week of July news updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x