राज्यात शाळांची उन्हाळी सुट्टी संपणार | आता विद्यार्थ्यांना ब्रीज कोर्स अनिवार्य | ब्रीज कोर्स म्हणजे काय?

मुंबई, ११ जून | कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते दुसऱ्या लाटेपर्यंत महाराष्ट्रात शाळा बंद आहेत. मार्च 2020 पासून महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. सलग दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. तर, 15 महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील प्रगती आणि उजळणीसाठी ब्रीज कोर्स घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ब्रीज कोर्स म्हणजेच उजळणी अभ्यासक्रम घेणार आहे. हा ब्रीज कोर्स इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल.
ब्रीज कोर्सची गरज काय?
महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर कोरोनाचं सावट आहे. गेल्या वर्षीपासून विद्यार्थी शाळेमध्ये आलेले नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्षभराच्या ऑनलाईन शिक्षणाच्या काळात किती कौशल्य विकसित केले आहेत. याची चाचणी ब्रीज कोर्समधून घेतली जाणार आहे.
ब्रीज कोर्समध्ये काय असणार?
एखादा विद्यार्थ्यी चौथीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार असेल तर त्याला शाळा सुरु झाल्यानंतर पहिले 45 दिवस तिसरीचा अभ्यासक्रम शिकवला जाईल. यामध्ये सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाची उजळणी करुन घेतली जाईल. 45 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयावरील पेपर द्यावा लागेल . हा पेपर गेल्या वर्षीच्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यातून विद्यार्थ्यानं किती कौशल्य प्राप्त केली आहेत, याची चाचणी घेतली जाईल. ब्रीज कोर्स शाळा सुरु झाल्यानंतर राबवण्यात येणार आहे.
गणित विज्ञान विषयाला अधिक महत्व:
ब्रीज कोर्समध्ये सर्व विषयांचे पेपर आयोजित केले जाणार असले तरी प्रामुख्यानं गणित आणि विज्ञान विषयावर अधिक भर असणार आहे. तर, सुरुवातीच्या 45 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांची ब्रीज कोर्सच्या माध्यमातून तयारी करुन घेतली जाणार आहे.
राज्यातील सर्व शाळांना बंधनकारक:
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने ब्रीज कोर्स महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांना अनिवार्य केला आहे. महाराष्ट्रातील सीबीएसई आणि इतर बोर्डांच्या शाळांना हा निर्णय लागू नसेल. दुसरी ते आठवीच्या वर्गासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रीज कोर्समधून विद्यार्थ्यांची पुढील वर्गातील अभ्यासक्रम शिकण्याची क्षमता देखील जाणून घेतली जाणार आहे.
News Summary: Schools in Maharashtra are closed from the first wave of corona to the second wave. Schools in Maharashtra have been closed since March 2020. Students have not been examined for two consecutive years. So, online learning has been going on for 15 months. According to the new rules, a bridge course will be conducted for the progress and revision of the students’ school curriculum. Maharashtra State Council of Educational Research and Training will conduct a bridge course. This bridge course will be compulsory for students of class II to VIII.
News Title: Maharashtra State Education research Training council make compulsory completion of bridge course for class 2 to 8 news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA