24 November 2024 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

BREAKING | इयत्ता पहिली ते आठवी परीक्षा रद्द | विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश - राज्य सरकार

Maharashtra students, Class 1st to 8th, Promoted next class

मुंबई, ३ एप्रिल: महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने कहर केला. गेल्या २४ तासांत राज्यांत तब्बल ४७,८२७ नवीन काेरोना रुग्ण वाढले आहेत. ही काेरोना महामारी सुरू झाल्यापासूनची उच्चांकी संख्या आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या २९ लाख ४,०७६ वर पाेहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही ३ लाख ८९,८३२ वर गेली आहे. गुरुवारी २०२ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या ५५,३७९ झाली आहे. दुसरीकडे, दिवसभरात २४,१२६ रुग्ण बरे हाेऊन घरीही परतले.राज्यातील एकूण कोरोनामुक्तांचा आकडा आता २४ लाख ५७,४९४ झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.६२ टक्क्यांवर आले आहे. राज्याचा मृत्युदर १.९१% इतका आहे.

दरम्यान राज्यातील परिस्थिती पाहता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयाने महत्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या प्रकारे राज्यात करोनाची रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आज मी आपल्याशी संवाद साधत असताना, इयत्ता पहिली ते आठवी याचे वार्षिक मुल्यमापन संदर्भात मी बोलणार आहे. मला सांगायला पाहिजे की मधल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं. खरंतर पहिली ते चौथीपर्यंत शाळा या वर्षात आपण शाळा सुरू करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी सुरू होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी देखील त्यांचा अभ्यासक्रम त्या पूर्ण करू शकल्या नाहीत. परंतु आपण सातत्यपूर्ण हा प्रयत्न करत होतो, की मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहचावं आणि मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये.

 

News English Summary: Announcement In view of the ongoing situation due to Covid 19, all state board students across Maharashtra state from Class 1st to Class 8th will be promoted to the next class without any examinations. A decision regarding students of class 9th and 11th will soon be taken said state education minister Varsha Gaikawad.

News English Title: Maharashtra state students from Class 1st to Class 8th will be promoted to the next class without any examinations news updates.

हॅशटॅग्स

#School(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x