महत्वाच्या बातम्या
-
BREAKING | FYJC प्रवेशासाठीची CET मुंबई हायकोर्टाकडून रद्द
अकरावी प्रवेशासाठीची CET हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. 28 मे चा यासंदर्भातला अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे हायकोर्टाने सांगितले आहे. राज्य सरकारनं निकालाला स्थगिती देण्याची याचिका केली होती. ही याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. मुंबई हायकोर्टात राज्य सरकारतर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली.
3 वर्षांपूर्वी -
HSC Exam Result | पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही - राज्य सरकार
मंगळवारी दुपारी राज्य शिक्षण मंडळानं बारावी परीक्षेचा निकाल लावला. राज्याचा सरासरी निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला. त्यामुळे आता इतक्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश कसे मिळणार? अशी चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पदवी प्रवेशासाठी CET परीक्षा घेतली जाणार नसून बारावीच्या निकालांच्या आधारावरच पदवी परीक्षेचे प्रवेश होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra HSC Result 2021 | राज्य मंडळाचा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के | इथे ऑनलाईन पहा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. HSC बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन सरासरी निकालांची टक्केवारी जारी केली. त्यानुसार, बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला आहे. अर्थातच एकूण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 99.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
CBSE 10th Result 2021 | CBSE दहावीचा निकाल थोड्याच वेळात | कसा पाहाल
सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा संपणार आहे. सीबीएसईकडून दहावीचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. दहावीचे विद्यार्थी cbseresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. शुक्रवारी सीबीएसईकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
HSC Result 2021 | बारावीचा निकाल उद्या दुपारी 4 वाजता | कुठे पहाल निकाल?
HSC बोर्डाच्या 12 वीचा निकाल उद्या सायंकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून सोमवारी ही माहिती जारी केली. http://mh-hsc.ac.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक टाकून निकाल पाहता येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
HSC Result 2021 | १२'वीचे बैठक क्रमांक जाहीर | ऑनलाईन असा मिळवा सीट नंबर - पहा स्टेप्स
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून लवकरच बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणं आवश्यक होतं.
3 वर्षांपूर्वी -
CBSE 12th Result 2021 | CBSE बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता जाहीर होणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आज दुपारी 2 वाजता 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करणार आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल जाहीर करण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवरुन आपले निकाल पाहता येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
शाळांचं 15% शुल्क कमी करा | कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करा | सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
आर्थिक गणित बिघडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय. महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावी. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिलेत. यावर 3 आठवड्यात आदेश देण्याचंही न्यायालयाने सांगितलंय. त्यामुळे शिक्षणाच्या नावाखाली बाजारीकरण करणाऱ्या शाळा व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना देखील दणका बसला आहे.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात - शिक्षणमंत्री
मागील दोन वर्ष कोरोनाचा फटका देश तसेच राज्यातील शैक्षणिक क्षेत्राला बसला आहे. लॉकडाऊन आणि सरकारच्या कडक निर्बंधांमुळे बहुतांश भागात शाळा वर्षभरापासून बंद आहेत. परिणामी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला असला तरी त्याला देखील अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात यंदाही २५ टक्के कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे.
3 वर्षांपूर्वी -
CET Online Application | विद्यार्थ्यांनो... वेबसाईट सुरळीत होताच ११'वी प्रवेशासाठी असा ऑनलाईन अर्ज करा - स्टेप बाय स्टेप
21 ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी http://cet.mh-ssc.ac.in/ हे संकेतस्थळ ज्यावर विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरत होते ते तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात आले असून अर्ज भरण्याची ऑनलाइन सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
MAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित
महाराष्ट्रातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
एकाचवेळी मिळणार १०'वीचे गुणपत्रक आणि सनद | विद्यार्थ्यांना सनदसाठी वर्षभर वाट पाहावी लागणार नाही
राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालनंतर आजवर ८ दिवसाच्या अंतराने गुणपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात येत होते. मात्र आता निकालानंतर मिळणाऱ्या गुणपत्रिकारबरोबरच सनद देखील मिळणार असल्याची माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली. दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात येतात.
3 वर्षांपूर्वी -
SSC निकाल झाला | 11'वी प्रवेशासाठी CET परीक्षेची तारीख जाहीर | प्रवेश प्रक्रिया कशी असेल?
इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता 11 वी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाईल, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे 10वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता सीईटीसाठी तयारीला लागण्याची गरज आहे.
3 वर्षांपूर्वी -
SSC Result 2021 | वेबसाइट क्रॅश, हॉलतिकीटच दिलं गेलं नसल्याने क्रमांकच माहीत नाही, निकाल कसा पहावा?
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीच्या परीक्षा यंदा कोरोनामुळे न घेताच निकाल जाहीर करण्यात आला. परंतु परीक्षा न देताच उत्तीर्ण होण्याचा हा आगळा वेगळा आनंद द्विगुणीत होऊ शकला नाही. ज्या बोर्डाच्या वेबसाइटवर आपले गुण किती हे पाहण्यासाठी विद्यार्थी आतुर झाले होते. ती साइटच निकालावेळी क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पास की नापास कळण्यासाठी बोर्डातील अधिकाऱ्यांना पालक आणि विद्यार्थ्यांनी दूरध्वनीवर संपर्क साधला असता थोडावेळात पाहता येईल असे जुजबी उत्तर देण्यात आले.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra SSC Result 2021 | दहावीचा निकाल ९९.९५ टक्के | असा पहा ऑनलाईन
करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे. (How to Check Maharashtra SSC Result 2021)
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra ITI Admission 2021 | आजपासून प्रवेशप्रक्रिया सुरु | कसा कराल अर्ज
ITI ADMISSION प्रवेश सत्र 2021 साठी राज्यातील 417 शासकीय आणि 549 खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (ITI) आज प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. यंदा शासकीय आयटीआयमध्ये 92 हजार तर खासगी आयटीआयमध्ये 44 हजार अशा एकूण 1 लाख 36 हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
3 वर्षांपूर्वी -
SSC Result 2021 | राज्यातील इयत्ता दहावीचा उद्या निकाल लागणार | असा ऑनलाईन चेक करा
राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यातील शाळांना दहावीचे गुण संगणकीय प्रणालीत नोंदवण्याची मुदत उलटून गेली आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणं अपेक्षित होता. आता ताज्या माहितीनुसार उद्या निकाल जाहीर होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
सकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार
राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून(15 जुलै) सुरू होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने याबाबत 5 जुलैला शासन निर्णय जारी केला होता. कोरोनामुक्त ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या परिसरातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग 15 जुलैपासून सुरू होणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
JEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्सच्या तिसऱ्या सेशनसाठीच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रक जारी करण्यात आले आहेत. तिसऱ्या सेशनच्या तारखांमध्ये थोडा बदल करण्यात आला असून त्या आता 20 जुलै, 22 जुलै, 25 जुलै आणि 27 जुलै या तारखांना परीक्षा होणार आहे. चौथ्या सेशनच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असं NTA ने सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
JEE Main Exam 2021 | JEE मेन परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु, असा करा अर्ज
जेईई मेन परीक्षा 2021 च्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी सुरु झाली आहे. जेईई मेन परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी नॅशनल टेस्टींग एजन्सीची वेबसाईट jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर अर्ज करु शकतात. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करु इच्छितात ते 12 जुलैपूर्वी अर्ज दाखल करु शकतात. जेईई मेन परीक्षा 2021 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागणार आहे. चौथ्या सत्राची परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो