21 April 2025 5:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षे वेळी सर्व्हर डाउन नव्हे | तो नियोजनबद्ध सायबर हल्ला

Planned Cyber Attack, Not Server Down, Mumbai University Exams, Minister Uday Samant

मुंबई, ९ ऑक्टोबर : शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 17 ऑक्टोबरपासून होत असून एकूण 50 हजार 417 विद्यार्थी ऑनलाईन तर 23 हजार 594 विद्यार्थी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

एकूण विद्यार्थ्यांची संख्या 34 हजार 599 तर विद्यार्थींनींची 39 हजार 415 आहे, असे सांगून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत पुढे म्हणाले, परीक्षार्थींमध्ये 112 दिव्यांग विद्यार्थी आणि 90 दिव्यांग विद्यार्थीनी आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 293 महाविद्यालयांमध्ये या परीक्षा होणार आहेत. सराव प्रश्नपत्रिका विद्यापीठामार्फत देण्यात येणार आहेत. मौखिक चाचणीही होणार आहे. मुंबईमध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेवेळी आलेल्या अडचणी लक्षात घेवून या परीक्षा घेण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेच्या वेळी सर्व्हर डाउन नव्हता तर नियोजनबद्ध सायबर हल्ला करण्यात आला होता असा आरोप उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेवेळी सर्व्हर डाऊन झाला नव्हता. तर तो सायबर हल्ला होता असा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे,अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा ऑनलाईन होत असतानासर्व्हर मध्ये बिघाड झाल्याचे समोर आले होते. या मुद्याकडे लक्ष वेधल्यावर मंत्री सामंत यांनी सांगितले की,’ याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू आणि सायबर विभाग प्रमुख रश्‍मी करंदीकर यांच्याशी चर्चा झाली आहे. कुलगुरूंनी दिलेल्या प्राथमिक अहवालामध्ये सायबर प्रणाली उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता असे नमूद केले आहे. हा सायबर हल्ला आहे. याबाबतची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली असून कालपासून त्याची चौकशी सुरू झाली आहे.

 

News English Summary: Higher and Technical Education Minister Uday Samant has alleged in Kolhapur that the server was not down during the Mumbai University exams but was a planned cyber attack. The server was not down during the Mumbai University exams. Preliminary reports say it was a cyber attack. The police have started an inquiry into the matter, Higher and Technical Education Minister Uday Samant told reporters here on Friday.

News English Title: Planned Cyber Attack Not Server Down During Mumbai University Exams Says Minister Uday Samant Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या