19 April 2025 7:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

दिवाळीनंतर १० वी -१२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळा ? | शिक्षण मंत्री म्हणाल्या

State Education Minister Varsha Gaikawad, 10th and 12th standard, school reopening

मुंबई, ६ नोव्हेंबर: अनलॉक ५ ची अंमलबजावणी राज्य सरकारकडून वेगाने सुरु असून येत्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होण्याचे संकेत याआधीच मिळाले आहेत. कालच सिनेमा थिएटर्स तसेच मनोरंजन क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर पुढची महत्वाची आखणी सुरु झाली आहे आणि ती म्हणजे राज्यातील शाळा सुरु करणे.

दरम्यान, दिवाळीनंतर राज्यातील शाळा प्रत्यक्ष उघडण्याचे संकेत महाविकास आघाडी सरकारने दिले होते. त्यानुसार १०वी आणि १२वीचे‌ वर्ग येत्या २३ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ विचार आहे, अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर १०वी-१२वीच्या शालेय विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेच्या वर्गाला हजेरी लावावी लागू शकते.

विशेष म्हणजे १०वी आणि १२वीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दहावी आणि बारावीचे‌ वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ प्रस्ताव आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली. परंतु याबाबत अजून कोणताही अंतिम अधिकृत निर्णय होणे बाकी आहे. त्याबाबत नियमावली, सूचना देखील अद्याप जाहीर झालेलय नाहीत.

 

News English Summary: The Mahavikas Aghadi government had signaled the actual opening of schools in the state after Diwali. Accordingly, it is planned to start 10th and 12th classes from November 23, Education Minister Varsha Gaikwad has informed the media. Therefore, after the end of Diwali, 10th-12th class students may have to attend school again.

News English Title: State Education Minister Varsha Gaikawad informed about 10th and 12th standard school reopening news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या