16 April 2025 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

पर्यावरणासंबंधित आरे कारशेड आंदोलनाला फाल्तू-बोगस म्हणणारा सुमित, पर्यावरणाचं 'बोगस' गांभीर्य पैसे घेऊन मालिकेत मांडतो तेव्हा

Actor Sumeet Raghavan

Sumeet Raghavan | मुंबईतल्या गोरेगावमध्ये आरे कारशेडवरून वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाला अभिनेता सुमीत राघवनने पाठिंबा दिला आहे. त्याने आरे कारशेडला विरोध करणाऱ्यांवर अनेकदा टीका केली आहे. अशात त्याने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. ज्यामुळे सुमीत राघवनला चांगलंच ट्रोल केलं जातं आहे.

सुमीत राघवनचं ट्विट काय?
सुमीतनं एक ट्विट रिट्विट केलं आहे. एका व्यक्तीनं एक व्हिडिओ शेअर केलाय. ‘फ्रेंचचे नागरिक क्लायमेट चेंज अॅक्टिव्हिस्ट लोकांची काळजी घेताना’ असं कॅप्शन लिहिलं आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती आंदोलनकर्त्यांना मारताना दिसत आहे. यानंतर सुमीतने असं म्हटलं आहे की आरेच्या आंदोलकांच्याबाबतीतही हेच करायला हवं होतं. डोक्यावर चढले होते, बोगस फाल्तू लोक. ना कामाचे ना धामाचे असं म्हणत सुमीत राघवनने आंदोलकांवर टीका केली आहे. त्यावरून आता त्याला प्रचंड ट्रोल केलं जातं आहे.

दरम्यान, परदेशात नागरिक निसर्गाप्रती तसेच पशुपक्षांप्रती किती जागृत असतात याची अनेक उदाहरण आहेत. भारतातील मोठे उद्योगपती तसेच मोदींचे मित्र गौतम अदानी यांना ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड सरकारने चांगलाच झटका दिला होता. क्वीन्सलँडच्या स्थानिक सरकारने देशातील दुर्मिळ सफेद गळ्याच्या ‘फिंच’ पक्षांच्या संरक्षणासाठी अदाणींच्या अब्जावदीच्या प्रकल्पाला स्थगिती दिली होती. तसेच तेथील स्थानिक नागरिक देखील अदाणींच्या या पर्यावरणाला हानिकारक खाण प्रकल्पाविरुद्ध रस्त्यावर उतरले होते आणि त्यामुळे सरकारवर देखील प्रचंड दबाव वाढला होता आणि सरकारने पर्यावरणासाठी मोठा निर्णय घेतला होता.

Finch

दरम्यान, निसर्गाशी काहीही देणं घेणं नसलेलं सरकार सध्या राज्यात आल्याने जंगल असलेल्या मुंबईतील आरे मध्ये सध्या मेट्रो३ संबंधित कारशेड बनवण्याचे काम जोमाने सुरु आहे, विकासाच्या नावाने त्यासाठी हजारो झाडांची कत्तल झाली आहे आणि पुढे ही होतं राहणार आणि त्यामुळे येथे आढळणाऱ्या तब्बल २१९ दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती देखील नष्ट होणार आहेत. मात्र आपल्या सरकारला आणि प्रशासनाला तब्बल काहीही दुःख नाही. मेट्रोला मुंबईकरांचा कधीच विरोध नव्हता. विरोध का याच मेट्रोचा कार शेड आरेत बांधण्याचा होता जे घनदाट जंगल आहे. अर्थात इतका विचार फिल्मी विचारधारेचे सुमित राघवन कुठून करतील आणि केलाच तर त्यासाठी आधी निर्मात्यांकडून पैसे घेतील आणि मग लोकांना निसर्गाचं महत्व सांगतील. सुमित राघवन यांना पर्यावरणाचं ज्ञान किंवा सामाजिक भान सोडा, त्यांना साधा कोणता विषय कोणत्या यंत्रणेशी संबंधित असतो हे देखील माहिती नाहो. म्हणजे राष्ट्रीय मार्गावरील अनधिकृत गोष्टींसाठी बीएमसीला प्रश्न विचारतात. तो राष्ट्रीय मार्ग आहे, त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारानं अपेक्षित असतं. पण तसं होताना दिसत नाही.

व्हिडिओ पुरावे
ज्याठिकाणी आरे कारशेडच बाधंकाम सुरु आहे तिथेच बिबटे रात्री येईल बसत आहेत याचे व्हिडिओ पुरावे समोर आले आहेत. तसेच आरे कारशेडपासून ५-६ मिनिटावर असलेल्या पोलीस कॅम्प पासून ते अनेक रहिवाशी सोसायट्यांमध्ये हे बिबटे घुसत आहेत. त्या प्राण्यांची चूक काय? विकासाच्या नावाखाली त्यांचं घर हडपलं गेलंय, अर्थात सुमितच घर कुठे आहे त्या आरे कॉलनीत, त्यामुळे लंडनच्या विकासाचं उदाहरण देताना, स्वतःच्या मालिकेत ‘अंग्रेजोने’ असे शब्दप्रयोग करून त्याला पर्यावरणाचं महत्व सांगताना प्रेक्षक पाहत असतील. असो पण तो फिल्मी विचारांचा आहे, हे त्यानेच सिद्ध केला आहे. त्यामुळे पर्यावरणासारखा विषय एखाद्या अशिक्षित आदीवासी व्यक्तीला कळेल, पण सुशिक्षित सुमित राघवनला समजेल असं वाटत नाही. त्यामुळे त्यामुळे त्याने पर्यावरण या विषयावर “फाल्तु” हा शब्द प्रयोग केला असावा असं दिसतंय.

Bibatya

पर्यावरण आणि वृक्षांबद्दल फिल्मी प्रेम
सुमीतला विरोध करताना काही नेटकऱ्यांनी वागले की दुनिया, नयी पिढीयां, नये किस्से मालिकेतील एका प्रसंगाचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी सुमीतला थेट प्रश्न विचारले. या व्हिडिओत सुमीत आणि त्याचे काही सहकारी झाडे तोडायला आलेल्यांना विरोध करताना दिसत आहे. तसंच सुमीत झाडे तोडणाऱ्यांना झाडांचं महत्त्व आणि ते कसे इथले मूळ निवासी आहेत, हे सांगताना दिसत आहे. सुमीत आणि त्याचे सहकारी ज्या झाडांच्या जवळ उभे आहेत, त्या झाडांवर त्यांच्या नावाच्या पाट्या लावलेल्या दिसत आहेत. मालिकेतील या प्रसंगाचा व्हिडिओ एका नेटकऱ्यानं शेअर करत सुमीतला म्हणाला की, ‘इथं खूप ज्ञान पाजळत होता तुम्ही?’

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, ‘याचं सगळं वागणंच दुटप्पी आणि बोगस…’ तर आणखी एका नेटकऱ्यानं देखील याच प्रसंगातील एक फोटो ट्विट करत लिहिलं आहे की, ‘इथून पुढे असली ढोंगे करण्याच्या नादाला लागू नका. पर्यावरण हा विषय तुमच्या समजुतीच्या बाहेरचा आहे. फक्त मालिकेत झाडाला मिठ्या मारून सांगण्याएवढे चिपको आंदोलन थिल्लर आणि उथळ नव्हते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Actor Sumeet Raghavan controversial tweet on Aarey Colony car shed protesters check details on 03 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Actor Sumeet Raghavan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या