23 February 2025 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office FD Vs RD | पोस्ट ऑफिस FD की RD, 5 लाखांच्या ठेवीवर जास्त फायदा कुठे मिळेल येथे जाणून घ्या Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार
x

कलाकारांना शूटींगदरम्यान कोरोनाची लागण, शूटिंगवर परिणाम होण्याची शक्यता

Actress, Corona positive, Shooting, Entertainment industry

मुंबई, ५ जुलै : मागच्या जवळपास १० दिवसांपासून टीव्ही मालिकांचं शूटिंग सुरू झालं आहे. मात्र हे शूटिंग करताना मात्र कलाकार आणि टेक्निकल टीमला बरीच आव्हानं पेलावी लागत आहेत. अनेकांना पूर्वीसारखं सेटवर सहजपणे वावरता येत नाही आहे. सरकारच्या गाइडलाइन्स प्रमाणे काम करत असतानाही अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. याशिवाय मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरातून बाहेर पडणाऱ्यांसाठी सरकारनं निर्बंध कडक केले आहेत त्यामुळे आता अनेक कलाकारांना रस्त्यात अडवलं जातं.

अलीकडे तेलगू मालिकांची अभिनेत्री नव्या स्वामी हिला शूटींगदरम्यान कोरोनाची लागण झाल्याने सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. 1 जुलैला नव्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. शूटींगदरम्यान नव्याला कोरोनाने ग्रासल्याने हिंदी व मराठी सिनेसृष्टीतही खळबळ माजली आहे. विशेषत: मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना कलाकारांचे शूटींगवर परतणे किती सुरक्षित आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारच्या गाइडलाइन्स पाळूनही सेटवर काम करणे सोपे नाही, हे लक्षात आल्याने अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

 

View this post on Instagram

 

#staystrong #staypositive #donotpanic #covid19 #fightforcorona #gocoronago #fighttogether #morepower #thankful #navyaswamy

A post shared by Navya Swamy (@navya_swamy) on

तत्पूर्वी अभिनेत्री जया ओझाला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी जवळपास 3 तास रस्त्यात थांबवून ठेवलं होतं. त्यानंतर तिला घरी परत पाठवण्यात आलं. तर दुसरीकडे सेटवर सर्वजण तिची वाट पाहत होते. मुंबईत कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनानं लोकांवर काही कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत निर्माते पोलिसांना अपील करत आहेत की, कलाकार आणि टेक्निशिअन्सना रोखून ठेऊ नका.

 

News English Summary: Telugu serial actress Navya Swamy has contracted a corona during the shooting, raising concerns. On July 1, the new corona test came back positive. During the shooting, the newcomer was hit by a corona, which has caused a stir in Hindi and Marathi cinema.

News English Title: Actress became corona positive by shooting how will the entertainment industry start News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x