15 January 2025 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

वायफळ वक्तव्य करणाऱ्यांची शिंदे गटात जोरदार भरती, टार्गेटप्रमाणे 'चिल्लर'युक्त वक्तव्य करून शिंदेंना अडचणीत आणण्यास सुरुवात

Actress Dipali Sayyad

Actress Dipali Sayyad | ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी त्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. स्वत: दिपाली सय्यद यांनीच या प्रवेशाची माहिती दिली आहे. दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, निलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली.

महापालिकेतील खोके मातोश्रीवर येण्याचं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना लागली आहे. सुषमा अंधारे आणि निलम गोऱ्हे या सर्व चिल्लर आहेत. यांच्यापेक्षा महत्त्वाच्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. खासदार संजय राऊतच शिवसेनेच्या फुटीला जबाबदार आहे. त्यांच्यामुळेच या सर्व गोष्टी घडल्या आहेत. राऊतांबद्दल एवढेच बोलले, त्यांना जी शिक्षा झाली ती त्यांच्या पापांची शिक्षा आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो याचं राऊत उत्तम उदाहरण आहेत, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.

विशेष म्हणजे राजकीय दृष्ट्या कुचकामी सिद्ध झालेल्या दीपाली सय्यद आप पक्ष, शिवसंग्राम, शिवसेना नंतर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. शिवसेनेत किंवा त्यापूर्वीच्या इतर पक्षात वायफळ वक्तव्यांशिवाय त्यांनी कोणतीही विशेष कर्तृत्व बजावलेलं नाही. केवळ आर्थिक बळावर एखादं निवडणुकीचं तिकीट मिळेल का या आशेने त्या शिंदे गटाकडे जातं असल्याचं म्हटलं जातंय. शिंदे गटाकडे महिला आघाडी नगण्य आहे. त्यात जो येईल तो मोठा अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. मात्र त्यांचा शिंदे गटाला काहीच फायदा नाही हे देखील राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

सुषमा अंधारे यांचं राजकीय ज्ञान आणि विषयाची मांडणी करण्याची राजकीय कला पाहिल्यास दिपाली सय्यद त्यापुढे वजा शून्य आहेत. यावर स्पष्ट बोलायचे झाल्यास, शिंदे गटातील वायफळ बोलणाऱ्या नेत्यांना अजून एक वायफळ बोलणारी पदाधिकारी जॉईन होणार आहे असं राजकीय तज्ज्ञ सुद्धा मिश्कीलपणे बोलत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Actress Dipali Sayyad target Rashmi Thackeray Sushma Andhare and Rashmi Thackeray check details 09 November 2022.

हॅशटॅग्स

#Actress Dipali Sayyad(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x