22 January 2025 4:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

भारतात कंगनाची सत्ता असल्याप्रमाणे ट्विटरला धमकी | म्हणाली भारतात तुमचा TikTok करेन

Actress Kangana Ranaut, Twitter action, Controversial tweets

नवी दिल्ली, ०५ फेब्रुवारी: टि्वटरने अभिनेत्री कंगना रणौतचे दोन टि्वटस काढून टाकले आहेत. कंगनाच्या या टि्वटसमुळे टि्वटरच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे हे टि्वटस हटवण्यात आले. शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटी बरोबर कंगनाचा सध्या वाद सुरु आहे. टि्वटरवरुन कंगना अत्यंत जिव्हारी लागणाऱ्या शब्दांमध्ये टीका करत आहे.

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणारे टि्वट केल्यापासून देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. कंगनाने रिहानासह देशातील सेलिब्रिटींवरही जोरदार टीका केली. दिलजीतला तिने खलिस्तानी म्हटले. शेतकऱ्यांबद्दलही तिने प्रक्षोभक टिप्पणी केली. त्यामुळे अनेक युझर्सनी टि्वटरकडे कंगनाच्या अकाऊंटची तक्रार केली व तिच्या टि्वटर अकाऊंटवर बंदी घालण्याची मागणी केली.

दरम्यान, संतापलेल्या कंगनाने थेट ट्विटरला अशी धमकी दिली आहे जणू भारतात तिचीच सत्ता असावी. कारण समाज माध्यमांवर कोणाही कारवाई किंवा कायदेशीर कारवाई करावी हे भारत सरकार करू शकतं. मात्र कंगनाने ट्विटरला जी धमकी दिली आहे ते पाहून तिच्या गरळ ओकणाऱ्या ट्विटरमागे कोणाचा हात असावा याचा प्रत्यय येऊ शकतो. ती ट्विट करताना म्हणाली की, ‘ट्विटर मला घाबरवत आहे की माझं ट्विटर बंद केलं जाईल आणि तेही मी कोणत्याही नियमांचा भंग केलेला नसताना…पण लक्षात ठेवा…ज्या दिवशी मी जाईन तेव्हा तुम्हालाही घेऊन जाईन….जे चीनच्या टिकटॉक’चं झालं तेच तुमचं होईल.

 

News English Summary: China puppet twitter is threatening to suspend my account even though I did not violate any rules, remember jis din main jaungi tumko saath lekar jaungi, just like Chinese tik tok you will be banned as well said Kangana Ranaut.

News English Title: Actress Kangana Ranaut talked on Twitter action after her controversial tweets news updates.

हॅशटॅग्स

#twitter(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x