मी गोमांस खाल्लंय म्हणणारी कंगना म्हणते | मंदिर बांधायला आई दुर्गेने मलाच निवडलं
मनाली, १० डिसेंबर: बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. वादग्रस्त पोस्टच्या माध्यमातून ती बर्याचदा चर्चेत राहते. शेतकरी आंदोलनाला विरोध करणारी ट्वीट ती सध्या सातत्याने करत आहे. आता कंगनाने अजून एक ट्वीट करून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधले आहे. यात कंगनाने स्पष्ट केलं की ती एक विशाल मंदिर बांधण्याचा विचार करत आहे. मंदिर बांधण्याच्या कामासाठी आई दुर्गेनेच तिची निवड केली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर लोकांनी बऱ्याच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
माता दुर्गेने मला भव्य मंदिर बनवण्यासाठी निवडले आहे. जे आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी उभारले होते. माता दुर्गा इतकी कृपाळू आहे की, तिने हे घरही स्वीकारले. पण मला एकदिवस असे मंदिर बनवायचे आहे, जी तिची किर्ती आणि आपल्या महान संस्कृतीच्या तोडीचे असेन. जय माता दी, असे ट्विट कंगनाने केले आहे.
Maa Durga chose me to build her temple, what our ancestors built for us it is not a patch on their achievements Devi is very kind to accept this humble abode but someday I wish to build a temple that will match up to her glory and our great civilisation. Jai Mata di. pic.twitter.com/KuWxItSSCE
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 10, 2020
कंगनाच्या या पोस्टवर लोकांनी आपल्या प्रतिक्रियाही द्यायला सुरुवात केली. काहींनी तिचं कौतुक केलं तर काहींनी तिच्यावर टीकाही केली. कंगनाची पोस्ट पाहून तिचे कट्टर चाहते म्हणाले की, ‘आम्हाला आमच्या हिमाचलच्या मुलीचा अभिमान आहे. खूप चांगली कल्पना आहे.’ तर अजून एका यूझरने लिहिले की, ‘तुझ्या मनात नक्की काय चाललं आहे हे देवाला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर तुला तिकीट तर मिळणारच नाही.’
विशेष म्हणजे २०१९ मध्ये चित्रपट निर्माता करण जोहरसोबत कंगनाचा वाद विकोपाला गेला होता. आणि आदित्य पंचोली सोबतही वाद तीव्र झाला होता. त्यावेळी समाज माध्यमांवर नेटिझन्सनी कंगनाला मोठ्या प्रमाणावर कंगनाला लक्ष करत प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावेळी एका नेटिझन्सने तिला झोडपताना तिच्या जुन्या मुलाखतीची आठवण करून दिली होत. त्यावर प्रतिउत्तर देताना मी केवळ मांसाहारीच नाही तर गोमांस खाणारी देखील आहे आणि त्यात काहीच चुकीचं नाही असं तिनं ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर बॉलीवूड संबधित पोर्टल्सवर याची जोरदार चर्चा देखील रंगली होती.
There is nothing wrong with eating beef or eating any other meat. It’s not about religion! It’s not a hidden fact that Kangana turned vegetarian 8 years ago and chose to be a yogi. She still doesn’t believe in just one religion. On the contrary, her brother eats meat. (1/2) https://t.co/keiUO3WP3P
— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 24, 2019
News English Summary: Maa Durga chose me to build her temple, what our ancestors built for us it is not a patch on their achievements Devi is very kind to accept this humble abode but someday I wish to build a temple that will match up to her glory and our great civilisation. Jai Mata di said Kangana Ranaut.
News English Title: Actress Kangana Ranaut will build Durga temple news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH