पश्चिम बंगाल निवडणूक | भाजपकडे उमेदवारांचा अभाव | फिल्मी कलाकारांच्या प्रवेशाचा सपाटा
कोलकत्ता, ०२ मार्च: २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांनी जेव्हा सीपीएमची गेल्या ३४ वर्षांपासून असलेली सत्ता उलथवून दिली, तेव्हा त्यांना बंगालमधील सेलिब्रिटींचे खूप पाठबळ मिळाले. यामध्ये खासकरून टॉलीवूडच्या या सेलिब्रिटींचा समावेश होता, ज्यांनी राज्यात बदल घडवून आणण्याचे आवाहन जनतेला केले हाेते. आता ममतांच्याच पावलावर पाऊल टाकत भारतीय जनता पक्षाचीही सेलिब्रिटींचा पाठिंबा घेण्याची इच्छा आहे.
मग संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मिथुन चक्रवर्ती यांची मुंबईत घेतलेली भेट असेल किंवा डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. अनिर्बान गांगुली यांची बंगालचे चर्चेतील अभिनेता प्रसेनजित चटर्जी यांची भेट असेल, या सर्वांचा संबंध बंगालमध्ये प्रभाव असलेल्या मोठ्या सेलिब्रिटींना आपल्याबराेबर घेण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याशी लावला जात आहे.
बंगाली चित्रपट उद्याेग अतिशय वाईट परिस्थितीतून वाटचाल करत आहे. आधी आम्ही वर्षातून ७५ ते ८० चित्रपट बनवायचाे, आता मुश्किलीने ३० ते ४० चित्रपट बनत आहेत. जे चित्रपट बनत आहेत त्याला प्रेक्षक मिळत नाही. आधी ७५० पेक्षा जास्त चित्रपटगृहे हाेती, आता सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स मिळून बंगालमध्ये १००च्या आसपास चित्रपटगृहे आहेत. त्यामुळे उद्याेगातील लाेकांच्या हाताला काम नाही. पक्षाच्या माध्यमातून मुंबईत प्रवेश मिळेल म्हणून अनेक सेलिब्रेटी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. कारण बंगालमध्ये आता चित्रपटाचा वार्षिक व्यवसाय १०० काेटी पण राहिलेला नाही. आधी ३००-४०० काेटी सहज कमावले जायचे. चक्रवर्ती यांच्या म्हणण्यानुसार बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागा आहेत त्यामुळे ताे प्रत्येक लहान-माेठ्या सेलिब्रेटीला पक्षात घेण्याच्या प्रयत्नात आहे.
आता बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती धरला. आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चटर्जींनी भारतीय जनता पक्षाप्रवेश केला. पश्चिम बंगालमधील प्रघातानुसार यंदाही निवडणुका ‘तारांकित’ होण्याची चिन्हं आहेत. पश्चिम बंगाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षाचे निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांचा पक्षप्रवेश झाला.
Bengali actor Srabanti Chatterjee joins Bharatiya Janata Party in Kolkata pic.twitter.com/tEE7OgqBDL
— ANI (@ANI) March 1, 2021
33 वर्षीय श्राबंती चटर्जी या बंगालमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मायार बंधनमधून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर चॅम्पियन, भालोबासा भालोबासा, वाँटेड, फायटर, इडियट यासारख्या अनेक बंगाली चित्रपटात त्या झळकल्या आहेत. डान्स बांगला डान्स या रिअॅलिटी शोचं परीक्षणही त्यांनी केले आहे. 2003 मध्ये राजीव विस्वास यांच्यासोबत श्राबंती चटर्जी यांनी लग्न केले होते.
News English Summary: When Mamata Banerjee overthrew the CPM for the last 34 years in 2011, she received a lot of support from celebrities in Bengal. This was especially the case with Tollywood celebrities who have called for change in the state. Now, following in Mamata’s footsteps, the Bharatiya Janata Party (BJP) also wants the support of celebrities. Now Bengali actress Shravanti Chatterjee is holding the Bharatiya Janata Party flag. Chatterjee joined the Bharatiya Janata Party against the backdrop of the forthcoming West Bengal Assembly elections.
News English Title: Actress Srabanti Chatterjee joins BJP before Assembly election 2021 news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH