22 February 2025 3:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Urvashi Rautela | 'या' अभिनेत्रीने परिधान केलाय चक्क 24 कॅरेट सोन्याचा पोशाख; व्हिडिओ होतोय वायरल - Marathi News

Urvashi Rautela

Urvashi Rautela | अनेक कलाकार मंडळी त्यांच्या वेगवेगळ्या अंदाज जातील, वेगवेगळ्या पोशाखांतील फोटोज आणि व्हिडिओज चहात्याबरोबर शेअर करतात. दरम्यान फॅशनसाठी ओळखलं जाणार हे एक नाव प्रत्येकाच्या तोंडात असतच ते म्हणजे उर्वशी रौतेला. उर्वशी रौतेला हिचे लाल रंगाचा ड्रेस परिधान करून रॅम वॉक करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. यामध्ये उर्वशी अत्यंत मनमोहक अंदाज जात दिसत आहे. तिने तिच्या सौंदर्यांमुळे अनेकांना भुरळ घातली आहे. परंतु सध्या तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्या लाल रंगाच्या ड्रेसची अधिक चर्चा होताना पाहायला मिळते. त्या ड्रेसमध्ये असं नेमकं काय आहे पाहूया.

चक्क 24 कॅरेट सोन्याचा ड्रेस :
उर्वशी रौतेला हिचे रॅम वॉक करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाले आहेत. यामध्ये उर्वशी एका स्टेजवर चालताना दिसत आहे. दरम्यान तिने सुंदर असा मेकअप करून, मणिपूरच्या महिलांसारखा पोशाख परिधान केला आहे. हा ड्रेस चक्क 24 कॅरेट सोन्याचा बनलेला आहे. संपूर्ण ड्रेसवर सोन्याचे काम पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिने दागिने देखील सोन्याचेच घातले आहेत. तिच्या या अनोख्या लुकची सर्वत्र वाहवाह होताना पाहायला मिळतीये.

असा आहे ड्रेस :
उर्वशीचा ड्रेस लाल चुटूक रंगाचा असून संपूर्ण ड्रेसवर सोन्याचे कोरीव काम पाहायला मिळते. एवढंच नाही तर तिने डोक्यापासून ते पायापर्यंत सोन्याचेच दागिने घातले आहेत. मणिपूरमधील महिला गोलाकार आकाराचा घागरा परिधान करतात त्याच पद्धतीचा घागरा उर्वशीने घातला असून ती या लुकमध्ये अतिशय मनमोहक दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmymantra Media (@filmymantramedia)

बर्थडेला कापला सोन्याचा केक :
उर्वशी रौतेला हिने नुकताच तिचा तिसावा वाढदिवस साजरा केला. या दरम्यान यो यो हनी सिंग याने उर्वशीला चक्क 24 कॅरेट सोन्याचा केक गिफ्ट केला. तिच्या या केकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान काहीजणांनी हनी सिंगवर ब्लॅकमनी व्हाईट मनीमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी त्याने उर्वशीला सोन्याचा केक गिफ्ट केला असल्याचा दावा अनेकजण करताना पाहायला मिळतायेत. याचं कारण असं की, तुम्ही कोणालाही कितीही महागडे गिफ्ट द्या त्याबद्दल कोणीही कोणतीही चौकशी करू शकत नाही. परंतु ही गोष्ट खरी आहे की खोटी ही आपण ठामपणे सांगू शकत नाही.

Latest Marathi News | Actress Urvashi Rautela wore a 24 carat gold dress 18 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Urvashi Rautela(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x