16 April 2025 8:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Viral Video | आदिपुरुष सिनेमातील छपरी डायलॉग्समुळे प्रचंड टीका, ओम राऊतने सिनेमाची प्रेरणा मोदींकडून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल

Adipurush Dialogs

Adipurush Dialogs | ‘आदिपुरुष’ सिनेमातील डायलॉग्समुळे निर्मात्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. रामायणावरील सिनेमात छपरी डायलॉग्सने या सिनेमावर प्रचंड टीका होऊ लागली आहे. या सिनेमातून एकप्रकारे हिंदू देवी-देवतांची अपमान करण्यात आला आहे अशी देखील टीका होऊ लागली आहे.

यानंतर लेखक मनोज मुंतशिर आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनीही एका टीव्ही मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं. मात्र, काहीही सुरळीत होताना दिसत नसल्याने सिनेमाविरोधात आंदोलन सुरूच आहेत. या सिनेमाच्या रिलीज होण्यापूर्वी लेखक मनोज मुंतशिर आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी अनेक भाजप नेत्यांची भेट देखील घेतली होती. तसेच लेखक मनोज मुंतशिर यांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील भेट घेतली होती.

मात्र आता सिनेमाच्या दिग्दर्शक आणि लेखकांवर प्रचंड टीका होऊ लागली आहे. सततच्या आंदोलनादरम्यान आता मनोज मुंतशिर यांनी एक लांबलचक पोस्ट शेअर करत लोकांच्या भावना दुखावणारे संवाद बदलले जातील असं म्हटलं आहे. मनोज मुंतशिर म्हणाले की, सुधारित संवादांसह हा चित्रपट या आठवड्यात चित्रपटगृहात दाखल होईल. सिनेमा गृहात सिनेमा पाहताना लोकं डायलॉग्स एकूण खूप हसत आहेत आणि त्यामुळे सिनेमागृहाच्या बाहेर पडल्यावर लोकांच्या तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक भाजप नेत्यांसोबत झळकल्याने प्रभू राम आणि भगवान हनुमान यांचा अपमान होऊनही भाजपचे नेते शांत राहणं पसंत करत आहेत. कारण, मोदी-शहानपुढे सर्वकाही लहान आहे अशी टीका होऊ लागली आहे.

आता या सिनेमाच्या अजून काही बाजू समोर येतं असल्याने भाजपच्या अडचणी अजून वाढत आहेत. आदिपुरुष सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी गौतम अदाणींच्या एनडीटीव्ही वृत्त वहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी आदिपुरुष हा सिनेमा बनवण्यामागे नरेंद्र मोदी हे आपली प्रेरणा आहेत असं म्हटलं होतं. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ओम राऊत म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी मला आदिपुरुषसारखा चित्रपट बनवण्यासाठी पोषक वातावरण दिले. पण रामायण सारख्या विषयावर बनलेला सिनेमा आता किती छपरी डायलॉग्सने भरला आहे हे पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय.

News Title : Adipurush Dialogs Om Raut interview on NDTV check details  on 18 June 2023.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adipurush Om Raut (1)(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या