17 April 2025 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Adipurush Movie | 'आदिपुरुष' सिनेमाची निर्मिती भाजपने केली आहे, राजकारणाचा प्रयत्न फसताच भाजप नेते शांत झाले - मुख्यमंत्री भूपेश बघेल

Adipurush Movie

Adipurush Movie | छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आदिपुरुष या वादग्रस्त चित्रपटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. हा चित्रपट भाजपच्या लोकांनी बनवला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. श्रद्धेचा अपमान करणाऱ्या या चित्रपटाबाबत भाजपचे नेते गप्प आहेत, असेही ते म्हणाले. आदिपुरुषचे संवाद आक्षेपार्ह आणि बेतल असून त्यांचे सरकार चित्रपटावर बंदी घालण्याचा विचार करू शकते, असेही भूपेश बघेल यांनी सांगितले. रामानंद सागर यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून लोकप्रिय टीव्ही मालिका रामायण बनवली होती, असा मजेशीर दावाही बघेल यांनी केला.

भाजपा की कालक्रम समझें: भूपेश बघेल
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भूपेश बघेल यांना आदिपुरुषांबद्दल प्रश्न विचारले असता त्यांनी भाजपवर टीका केली. याबाबत त्यांनी ट्विटही केले आहे, ज्यात लिहिले आहे की, ‘आदिपुरुष’ हा चित्रपट भाजपच्या लोकांनी बनवला आहे. हे लोक सतत आमच्या श्रद्धेचा अपमान करत असतात. ट्विटमध्ये भूपेश बघेल यांनी पत्रकारांशी झालेल्या संभाषणाची एक व्हिडिओ क्लिपही शेअर केली आहे, ज्यामध्ये ते म्हणाले आहेत, “भारतीय जनता पक्षाची रणनीती समजून घ्या.

मर्यादा पुरुषोत्तम राम कसे युद्धखोर बनले, या लोकांनी हनुमानजींना रागीट कसे बनवले आणि आता हा चित्रपट आला आहे. या चित्रपटाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, आसामचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद दिले होते. कारण हा चित्रपट भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बनवले आहे आणि आज म्हणूनच योजना फसताच भारतीय जनता पक्षाचे सर्व लोक गप्प झाले आहेत. कारण त्यांना फक्त त्यांच्या व्यावसायीक राजकारणाची चिंता आहे. आपल्याकडे अनेक आराध्य दैवतं आहेत, आपला त्यांच्यावर विश्वास आहे, पण भाजपसाठी हा राजकारणाचा विषय आहे. प्रभू राम असोत किंवा हनुमानजी, ते त्यांचा केवळ राजकारण आणि व्यापारीकरणासाठी वापर करत आहेत, ज्याचा आम्ही निषेध करतो असं ते म्हणाले.

धर्माचे ठेकेदार बनलेले पक्ष आता गप्प का : भूपेश बघेल
छत्तीसगडमधील चित्रपटगृहांमध्ये आदिपुरुष चित्रपट दाखवण्यावर बंदी घालण्याच्या मागणीवर सरकार विचार करू शकते, असेही भूपेश बघेल यांनी सांगितले. या चित्रपटाच्या संवादातील शब्दांची निवड अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या दर्जाची असल्याचे ते म्हणाले. बघेल म्हणले की यांचा पुढच्या पिढीवर काय परिणाम होईल? जनतेची मागणी असेल तर आम्ही या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा विचार करू, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, चित्रपटात भगवान हनुमानाचे संवाद अशा प्रकारे ठेवण्यात आले आहेत जे बजरंग दलाच्या लोकांनी वापरलेले शब्द आहेत. आपल्या पूर्वजांनी अशा हनुमानाची कल्पनाही केली नव्हती आणि आजचा समाजही ते स्वीकारू शकत नाही. बघेल म्हणाले की, जे छोट्या छोट्या मुद्द्यांवरही चित्रपटगृहे बंद करतात, त्यांना आग लावतात, ते या विषयावर गप्प आहेत. धर्माचे ठेकेदार बनलेले राजकीय पक्ष आता गप्प का आहेत?

News Title : Adipurush Movie CM Bhpesh Baghel serious allegations on BJP check details on 21 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adipurush Movie(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या