25 December 2024 1:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

Adipurush Teaser Out | 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर आला समोर, टीझरमध्ये प्रभास आणि सैफ अली खानचा लुक पाहून चाहते खुश

Adipurush Teaser Out

Adipurush Teaser Out | हिंदी चित्रपटापेक्षा प्रेक्षकांचा कल तमिळ चित्रपटांकडे वळाला आहे. 2015 मध्ये बाहुबली चित्रपट रिलीज झाला होता तर 2017 मध्ये मोठ्या बजेटसोबत बाहुबली 2 रिलीज झाला होता. बाहुबली चित्रपटातील मुख्य भुमिका साकारणारा प्रभास लवकरच मोठ्या बजेटसह ‘आदिपुरुष’ चित्रपट घेऊन येत आहे. दरम्यान, ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. 1 मिनिट 46 सेकंदाच्या या टीझरमध्ये प्रभास आणि सैफ अली खानने त्यांचे कौशल्य दाखवले आहे, क्षणामध्ये तुम्ही टीझर मध्ये हरवून जाल. टीझर यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर पाहून अंदाज बांधता येतो की, चित्रपटावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला आहे.

ग्राफिक्सचा उत्तम वापर :
‘बाहुबली’ चित्रपटाप्रमाणेच ‘आदिपुरुष’ चित्रपटातही जबरदस्त ग्राफिक्स वापरण्यात आले आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, चित्रपटातील प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तिरेखा अतिशय बारकाईने काम करत आहेत. टीझरमध्ये प्रभास हातात धनुष्य आणि केस बांधलेल्या प्रभु श्री राम यांच्या ‘आदिपुरुष’ लूकमध्ये दिसला, तर सैफ अली खान रावणाच्या लूकमध्ये दिसून आला आहे, तर क्रिती सेनॉन सीता मैया यांच्या लूकमध्ये दिसून आली आहे. इतकंच नाही तर टीझरच्या प्रत्येक सीनवर इतके पैसे खर्च करण्यात आले आहेत की प्रत्येक सीन तुम्हाला वास्तवाची जाणीव करून देईल.

टीझर झाला आऊट
‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास आणि सैफ अली खानशिवाय इतर अनेक स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. क्रिती सेनॉन या टीझरमध्ये एक झलक पाहायला मिळाली आहे. या चित्रपटात क्रिती माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे, तर देवदत्त हनुमानाच्या भूमिकेत आणि सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 12 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Adipurush Teaser Out checks details 3 October 2022

हॅशटॅग्स

Adipurush Teaser Out(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x