16 April 2025 2:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

Tim Cook with Madhuri Dixit | आमची मुंबई! ॲपल CEO टीम कुक यांनी मुंबईत माधुरी दीक्षित सोबत वडा पावचा स्वाद अनुभवला

Apple CEO Tim Cook eat Mumbai Vada Pav with Madhuri Dixit check details on 18 April 2023

Tim Cook with Madhuri Dixit | अधिकृत ॲपल स्टोअर मुंबईत सुरू होणार आहे, ज्यामुळे टिम कुक सध्या मुंबई भेटीवर आहेत. बॉलिवूड स्टार्सच्या शहरात टिम कुक त्यांना भेटणार नाहीत, असं होऊ शकतं का? ॲपलच्या सीईओंनी सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितची भेट घेतली. माधुरी दीक्षितने टीम कुक यांचे मुंबई स्टाईलमध्ये स्वागत केले. माधुरीने टीम कुक यांना मुंबईचा प्रसिद्ध वडापाव खायला दिला.

ज्यानंतर टिम कुक यांनी आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यात दोघेही हसताना आणि वडापाव एन्जॉय करताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ‘मुंबईत वडापावपेक्षा चांगले रिसेप्शन असूच शकत नाही’.

माधुरी दीक्षितनेही आपल्या ट्विटरवरून हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘वडापावने मुंबईत तुमचे स्वागत करण्यापेक्षा चांगले काहीअसू शकत नाही’. टीम यांनी माधुरी दीक्षितच्या या फोटोला रिप्लाय देत लिहिलं आहे की, “माझ्या आयुष्यातील पहिला वडापावची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद माधुरी दीक्षित, वडापाव खूप चविष्ट होता.

यूजर्सच्या मजेदार कमेंट्स
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर अनेक मजेशीर कमेंट्स येत आहेत. सोशल मीडियावर लोक माधुरीचं कौतुक करताना थकत नाहीत. एका युजरने लिहिले की, ‘वाह माधुरी, तू या छोट्या छोट्या गोष्टींनी मन जिंकतेस. कुणी मिर्चीसोबत वडापाव घेताना कुक भाऊ लिहिलं, तर कुणी भारतीय स्नॅक्स जगातील सर्वोत्तम असल्याचं म्हटलं. एका युजरने गमतीने लिहिले की, “आता वडाशिवाय वडापावची कल्पना करा, फक्त आम्ही आयफोन वापरकर्त्यांना फोन विकत घेताना आणि चार्जर मिळत नाही तेव्हा असेच वाटते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Apple CEO Tim Cook eat Mumbai Vada Pav with Madhuri Dixit check details on 18 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tim Cook with Madhuri Dixit(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या