25 December 2024 2:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

Bigg Boss 16 | वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 16' सीझनमध्ये राजकारणी, मॉडेल आणि अ‍ॅक्टर अर्चना गौतम लवकरच झळकणार

Archana Gautam

Archana Gautam |  टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ सीझन सुरू झाला असून, यावेळी सलमान खानच्या शोमध्ये नर्तक, अभिनेते, गायक आणि राजकारणी देखील दिसून येणार आहेत. त्याचवेळी, शोच्या सुरुवातीपासूनच स्पर्धक अर्चना गौतम खूपच चर्चेमध्ये आहे, जी एक अभिनेत्री आणि मॉडेल तसेच व्यवसायाने राजकारणी देखील आहे. अर्चना 2018 साली मिली बिकिनी इंडियामध्ये देखील झळकली आहे, आणि तिने इतर अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत.

अर्चना राजकारणी देखील आहे :
पहिल्याच दिवशी अर्चना गौतमने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ‘बिग बॉस’चा भाग बनली आहे. याशिवाय अर्चनाने सांगितले की, तिला राजकारणामध्ये पुढे जायचे आहे, मेरठची रहिवासी असलेल्या अर्चना यांचा जन्म 1 सप्टेंबर 1995 रोजी झाला. एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री असण्यासोबतच तिने यूपीमधून आमदारकीची निवडणूकही लढवली आहे. वास्तविक, काँग्रेसने त्यांना मेरठमधील हस्तिनापूरमधून तिकीट दिले होते, परंतु अर्चना तिथून जिंकू शकल्या नाहीत मात्र, अर्चनाला अजूनही राजकारणात करिअर करायचे असल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे.

अर्चना ही बिकिनी मॉडेल आहे :
अर्चना गौतमला बिकिनी गर्ल म्हणूनही ओळखले जाते तर तिने 2018 मध्ये मिस बिकिनी गर्लचा किताब देखील पटकावला आहे. इतकंच नाही तर अर्चनाला साऊथची सनी लिओन सुद्धा म्हटले जाते. याशिवाय अर्चना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते जिथे ती तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसून येते. अर्चनाचे इन्स्टाग्रामवर 752K फॉलोअर्स आहेत. ती तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात तसेच अर्चनाने 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि यानंतर तिने ‘बारात कंपनी’ आणि ‘हसीना पारकर’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. अर्चनाने बॉलिवूडशिवाय साऊथच्या चित्रपटांमध्येही झळकली आहे. आता अर्चना ‘बिग बॉस 16’ मध्ये दिसून येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Archana Gautam (@archanagautamm)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Archana Gautam will appear in Bigg Boss 16 Checks details 05 October 2022.

हॅशटॅग्स

#Bigg Boss 16(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x