17 April 2025 3:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Avatar The Way of Water | अवतार 2 ने तोडला अव्हेंजर्स एंडगेमचा विक्रम, सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला

Avatar The Way of Water

Avatar The Way of Water | अवतार : द वे ऑफ वॉटर हा चित्रपट प्रदर्शित होऊन २३ दिवस झाले आहेत. पण चित्रपटाच्या कमाईचा वेग काही थांबत नाहीये. प्रदर्शनापूर्वी सर्वाधिक अॅडव्हान्स तिकीट बुकिंगचा विक्रम या सिनेमाने केला असतानाच आता प्रदर्शनानंतरही अवतार 2 ने आणखी एक विक्रम केला आहे.

अवतार 2 ने तोडला अव्हेंजर्स एंडगेमचा विक्रम
16 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात गाजत आहे, ज्यामुळे या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 454 कोटींची कमाई केली आहे. ज्यामुळे अवतार 2 आता अव्हेंजर्स एंडगेमला मागे टाकत भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. होय, अवतार 2 ने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली आहे. हा चित्रपट आता एंडगेमला मागे टाकत भारतात सर्वाधिक कमाई करणारा पहिला हॉलिवूडपट ठरला आहे. एंडगेमने भारतीय बॉक्स ऑफिसवर 373.22 कोटी रुपयांची कमाई केली, तर अवतार 2 ने भारतात 454 कोटी रुपये जमा केले आहेत. अवतारची कमाई एंडगेमपेक्षाही जास्त आहे.

अवतार 2 अनेक भाषांमध्ये प्रदर्शित
यापूर्वी भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर, द जंगल बुक आणि द लायन किंग सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमधील चित्रपटगृहांमध्ये ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ यशस्वीपणे सुरू आहे. म्हणूनच प्रेक्षकांना तो खूप आवडला आणि अजूनपर्यंत कमाई करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Avatar The Way of Water Vs Avengers Endgame box office record check details on 11 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Avatar The Way of Water(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या