टकटक गँग | अभिनेते भारत गणेशपुरे यांनी अनुभवला एक वाईट प्रसंग

मुंबई, ८ ऑगस्ट : तुमची गाडी सिग्नलवर उभी असेल, तर टकटक करून लक्ष वेधून घ्यायचे आणि तुमच्या किंमती वस्तू लंपास करायच्या, अशी शक्कल लढवण्यात टकटक गँग माहीर असते. मात्र आता तेवढ्यापुरते आपले हस्तकौशल्य न दाखवता थेट आयफोनची आंतरराष्ट्रीय सुरक्षा भेदून फोनमधला पूर्ण डाटाच डिलिट करण्यापर्यंत ही टोळी हायटेकही झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका खासगी कंपनीत असोसिएट व्हाइस प्रेसिडेन्ट पदावर असलेल्या ३२ वर्षांच्या तरुणास ठाण्यातील मानपाडा पुलावर अशा फसवणुकीचा फटका बसला होता.
मात्र आता ‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांना एका वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले. ते आपल्या गाडीत असताना पश्चिम दृतगतीमार्गावर कांदिवली येथे एका टोळक्याने त्यांचा मोबाईल लांबविला. हा प्रसंग त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत सांगितला आहे. तसेच त्यांनी सगळ्यांना गाडीतून प्रवास करताना सावधान राहा, असे आवाहन केले आहे. तुम्हाला कोणी निर्दयी म्हटले तरी तुम्ही गाडीच्या काचा खाली घेऊ नका, असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबईत दोन दिवस तुफान पाऊस कोसळत होता. कांदीवली येथे वाहतूक कोंडी असताना भारत गणेशपुरे यांनी आपली कार उभी केली होती. यावेळी एका टोळीने मदत मागण्याचे नाटक केले. गाडीच्या काचेवर टकटक केली आणि दुसऱ्या बाजुने काही लोकांनी दरवाजा उघड त्यांचा मोबाईल चोरला. मोबाईल चोरीचा हा अनुभव स्वतः भारत गणेशपुरे यांनीच व्हिडिओ शेअर करत सांगितला आहे. तसेच सर्व नागरिकांना असे काही घडले, तर सावध राहा, असे सांगायला ते विसरलेले नाहीत.
‘आज माझा मोबाईल लुटून नेला आहे. ही घटना कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या फ्लाय ओव्हरवर घडली. दरड कोसळल्यामुळे तेथे खूप पाऊस होता, खूप ट्रॅफिक होते. त्यावेळी दोन माणसे आली आणि त्यांनी खूप विचित्र पद्धतीने माझी गाडी ठोठावली, मात्र तरीही मी काच उघडली नाही. मात्र, माझ्या दुसऱ्या बाजूला असलेल्या माणसाने कारचा दरवाजा उघडला. त्याक्षणी त्या व्यक्तीने ओकारी काढण्याचे नाटक केले. त्याचवेळी माझ्या बाजूने एक माणूस आला आणि काच वाजवली. मी त्याच्याकडे पाहिले, तर तितक्यात ओकारी काढणाऱ्या माणसाने माझा मोबाईल चोरुन नेला.’, असा प्रसंग या व्हिडिओतून व्यक्त केला आहे.
News English Summary: Famous actor Bharat Ganeshpure had to face a bad situation. While he was in his car, a mob snatched his mobile phone at Kandivali on the Western Expressway. He has shared this incident by sharing a video.
News English Title: Bharat Ganeshpure mobile theft by TakTak Gang News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID