16 April 2025 7:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Bigg Boss 16 | भाईजान सलमान खानने केले खुलासे, रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 16' मध्ये देखील स्पर्धकांसोबत गेम खेळणार

Big Boss 16

Bigg Boss 16 | प्रेक्षकांची प्रतिक्षा अखेर संपली, लवकरच टीव्हीचा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ प्रसारित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 2006 पासून या शो ने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसूर केलेली नाही. दरम्यान, लॉन्चच्या आधी, होस्ट आणि सुपरस्टार सलमान खानने पत्रकार परिषदेत मीडियाशी संवाद साधला आणि शो संबंधीत काही मनोरंजक खुलासे देखील केले आहेत. या सीझनमध्ये बिग बॉस देखील स्पर्धकांसोबत गेममध्ये सहभागी होणार असून ‘वीकेंड का वार’ आता शुक्रवार आणि शनिवारी येणार आहे असे ही यावेळी सांगण्यात आले आहे. या कॉन्फरन्समध्ये सलमानने शोशी संबंधित आणखी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

वीकेंड का वार शुक्रवार आणि शनिवारी
वीकेंड का वार शुक्रवार आणि शनिवारी असणार आहे. म्हणजेच सलमान खान आता शुक्रवार आणि शनिवारी स्पर्धकांचा क्लास घेताना दिसून येणार आहे. यापूर्वी सलमान स्पेशल डे किंवा वीकेंड का वार एपिसोडमध्ये दिसून यायचा, जे शनिवार आणि रविवारी असायचे. त्याचवेळी सलमानने या सीझनचा पहिला स्पर्धक अब्दू रोजिकची ओळख करून दिली आणि चाहत्यांना नवीन सीझनची झलक देखील दाखवली आहे.

‘बिग बॉस 16’ हंगाम असेल वेगळा
हा हंगाम मागील हंगामांपेक्षा वेगळा आणि अप्रत्याशित मानला जात आहे. या शोबाबत प्रेक्षकांमध्ये आधीच चर्चा आहे तसेच बिग बॉस गेममध्ये सहभागी झाल्याचा खुलासा चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे मात्र, बिग बॉस या शोमध्ये शारीरिकदृष्ट्या दिसून येणार नाही. ‘बिग बॉस 16’ च्या प्रीमियरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे स्पर्धक या शोमध्ये असणार आहेत
प्रत्येक सीझनप्रमाणे या सीझनमध्येही काही लोकप्रिय सेलिब्रिटींचा शोमध्ये समावेश असणार आहे. टीना दत्ता, श्रीजिता डे, गौतम विज, शालिन भानोत, सुंबुल तौकीर आणि निमृत कौर अहलुवालिया या टीव्ही कलाकार या शोमध्ये दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Big Boss 16 superstar Salman Khan new update checks details 30 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Big Boss 16(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या