15 January 2025 9:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Big Boss Marathi | शिवीगाळ करून BIP-BIP ऐकू येऊनही त्यावर शिक्षा तर सोडा; जानवी किल्लेकरच्या जाऊबाई संतापल्या

Big Boss Marathi

Big Boss Marathi | बिग बॉस हा कार्यक्रम मराठी टेलिव्हिजनचा सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम ठरला आहे. नुकताच भाऊचा धक्का पार पडला. अशातच ‘जानवी तुम्हाला भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही’ असं रितेश भाऊंनी मागील आठवड्यातच जाहीर केलं होतं. त्यानंतर जानवीला जेलबंद देखील केलं गेलं. संपूर्ण आठवडा जेलबंद राहून आणि बिग बॉसच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून जानवीने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा जागा कमावली आहे.

तरी सुद्धा आत्ताच्या झालेल्या भाऊच्या धक्क्यावर जानवी किल्लेकरला स्थान मिळालं नाही. यावेळेसही तिला वाळीत टाकल्यासारखं बाजूला करण्यात आलं. जानवीच्या घरच्यांना ही गोष्ट कुठेतरी खटकली आहे. दरम्यान सोशल मीडियावर जानवीच्या जाऊबाईंची म्हणजेच संध्या किल्लेकर यांची एक पोस्ट तुफान वायरल होत आहे. या पोस्टने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत सोबतच बिग बॉस प्रेमींच्या समोर एक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलाय. चला पाहूया या पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय.

* संध्या किल्लेकरांनी भली मोठी पोस्ट लिहत म्हटलंय की,” घरातील वस्तूंची आदळआपट करून Bigg Boss House चे नियमभंग करणाऱ्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे…
* टास्कमध्ये आक्रमकता दाखवून physically violent होण्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे…
* घरातीलच एका सदस्यावर Bip Bip.. ऐकू येऊनही साधी शिक्षा तर सोडा पण चर्चाही नाही.. पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे…
* आणि जानवीने केलेल्या चुका तिने मान्य करूनही, घरातील व प्रेक्षकांची मनापासूनमाफी मागूनही, प्रामाणिकपणे आठवडाभर शिक्षा भोगूनही भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही…
* हे खरंच खूप Unfair आहे जानवीसाठी.. घरातील इतर सदस्यांप्रमाणे तिलाही भाऊच्या धक्क्यावर बसण्याचा तितकाच अधिकार आहे…”. अशी भली मोठी पोस्ट लिहत जानवीच्या जाऊने नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर संध्यांच्या

या पोस्टला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल देखील केलं आहे.

जानवी बद्दल सांगायचं झालं तर तिने आतापर्यंत काही कोळी गाणी केली आहेत. ‘कोळीवाडा झिंगला’, ‘दर्याची मासोली’ या गाण्यांमध्ये जानवी दिसली. तिची दोन्ही गाणी सुपर डुपर हिट ठरली. अनेक तरुण मंडळी कार्यक्रमांमध्ये डीजेवर जानवीची गाणी लावून थीरकताना दिसतात.

दरम्यान आता बिग बॉसच्या जेलमधून जानवी बाहेर जरी आली असली तरीसुद्धा ती काही शांत बसली नाही. छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम आणि जानवीमध्ये तूफान राडा झाल्याचं दिसलं. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात जानवीला परत जेलमध्ये जायचं आहे का? अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

News Title : Big Boss Marathi season 5 Janhavi Killekar sister in law Sandhya Instagram post 04 September 2024.

हॅशटॅग्स

#Big Boss Marathi(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x