12 January 2025 12:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात होणार रीयुनियन, पुन्हा एकदा पाहायला मिळणार अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • अरबाज निक्कीला भेटण्यासाठी आतुर :
  • अशा पद्धतीने निक्कीने अरबाजला सुनवलं :
  • नवनवीन सदस्यांची घरात एन्ट्री :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक आहे. उद्या समस्त महाराष्ट्राला कळणार आहे की, बिग बॉसची ट्रॉफी कोणता सदस्य घरी घेऊन जाणार आहे. दरम्यान आजच्या भागाचा एक प्रोमो कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये खेळातून आणि बिबींच्या घरातून बाद झालेले सर्व सदस्य घरातील आपल्या लाडक्या सदस्यांना भेटायला येणार आहेत. आजचा भाग अतिशय स्पेशल असणार आहे. कारण की बिग बॉसच्या घरात रीयुनियन होणार आहे.

अरबाज निक्कीला भेटण्यासाठी आतुर :

बिग बॉसच्या घरातील रीयुनियन भागाचा प्रोमो वायरल झाला असून. घरातील सर्व सदस्य म्हणजेच इरीना, वैभव, वर्षाताई, अरबाज, पुरुषोत्तम दादा, संग्राम, घनश्याम हे सर्व सदस्य घरातील टॉप 6 सदस्यांना भेटण्यासाठी येणार आहेत. दरम्यान प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे निक्की बिग बॉसच्या घरातील मुख्य प्रवेशद्वाराकडे पाहत असते तितक्यात अरबाज धावत पळत निक्कीची भेट घेण्यासाठी अगदी कावरा बावरा झालेला असतो. तो पळत येतो आणि थेट निक्कीला उचलून घेतो. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारून हळवे होऊन रडू लागतात. त्यानंतर बेडरूम एरियामध्ये जाऊन एकमेकांचा हात धरून एकमेकांना पाहत राहतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अशा पद्धतीने निक्कीने अरबाजला सुनवलं :

या आधी घरामध्ये कौटुंबिक सोहळा पार पडला होता त्या सोहळ्यादरम्यान निक्कीच्या आईने तिला एका कोपऱ्यात जाऊन अरबाजचा साखरपुडा झालेला आहे असं सांगितलं होतं. तेच डोक्यात धरून निक्की अरबाजला म्हणाली की,”मला वाटलं तुझं बाहेर असेल लफडं म्हणून तू तुटलाय माझ्यापासून”. निक्कीच्या अशा बोलण्याने अरबाजच्या चेहऱ्यावर अक्षरशः बारा वाजलेले पाहायला मिळतात. पुन्हा या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. आजचा भाग सर्वांसाठी अतिशय स्पेशल असणार आहे. दरम्यान उद्याच्या महाअंतिम सोहळ्यासाठी देखील प्रेक्षकवर्ग आतुर झाला.

नवनवीन सदस्यांची घरात एन्ट्री :

बिग बॉसच्या घरात नुकतीच पिंगा ग पोरी पिंगा या आगामी मालिकेतील कलाकारांनी उपस्थिती दर्शवून घरातील सदस्यांचं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्याचबरोबर एक नवीन कथा घेऊन अमेय आणि अभिनेत्री अमृता खानविलकर या दोघांनी देखील बिग बॉसच्या घरात उपस्थिती दर्शवली होती. यादरम्यान अभिजीत आणि अमृताने चंद्रा या गाण्यावर चांगलाच ताल धरला होता. अभिजीतच्या अदांमुळे अमृता गमतीत म्हणाली की,”अभिलाषा माझ्या पोटावर पाय देऊ नको”. त्यानंतर सर्वांची मज्जा मस्ती सुरूच होती.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi 05 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x