Bigg Boss Marathi 3 | ग्रँड प्रिमिअरला अवघे काही तास शिल्लक | हे आहेत संभाव्य स्पर्धक
मुंबई, १९ सप्टेंबर | बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा ग्रँड प्रिमिअर आज (19 सप्टेंबर) संध्याकाळी सात वाजता होणार आहे. आपल्या खास शैलीत ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची शाळा घेणारे दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘कलर्स मराठी’वरील या धमाकेदार रिअॅलिटी शोचे शानदार प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss Marathi 3) घरात कोण दिसणार, याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे. ग्रँड प्रिमिअरला अवघे काही तास शिल्लक असताना काही संभाव्य स्पर्धकांची नावं समोर आली आहेत.
Bigg Boss Marathi 3, ग्रँड प्रिमिअरला अवघे काही तास शिल्लक, हे आहेत संभाव्य स्पर्धक – Bigg Boss Marathi 3 confirmed list of contestants this season :
सोनाली पाटील:
टिकटॉक गर्ल म्हणून सोनाली पाटीलने ओळख मिळवली होती. कोल्हापूरच्या सोनालीने ‘वैजू नंबर वन’ मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेतील अॅडव्होकेटच्या भूमिकेमुळे सोनालीला नव्याने ओळख मिळाली.
सुरेखा कुडची:
लावणी क्वीन म्हणून सुरेखा कुडची यांची ओळख आहे. सासूची माया, पोलिसाची बायको, भरत आला परत, फॉरेनची पाटलीण यासारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय देवयानी, रुंजी, नवरी मिळे नवऱ्याला, चंद्र आहे साक्षीला यासारख्या मालिकांतही त्यांनी काम केलं आहे. नुकतंच स्वाभिमान या मालिकेतून त्यांनी एक्झिट घेतल्यानंतर त्या बिग बॉसच्या घरात दिसण्याची शक्यता वाढली.
स्नेहा वाघ:
अधुरी एक कहाणी, काटा रुते कुणाला यासारख्या मालिकांतून स्नेहा वाघने लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर ज्योती मालिकेतून स्नेहाने हिंदी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. एक वीर की अरदास.. वीरा, शेर ए पंजाब – महाराजा रणजीत सिंह, चंद्रशेख, बिट्टी बिजनेस वाली, मेरे साई, चंद्रगुप्त मौर्या, कहत हनुमान जय श्री राम यासारख्या अनेक मालिकांमधून तिने नाव कमावलं.
चिन्मय उदगीरकर:
स्वप्नांच्या पलिकडले या मालिकेतून चिन्मयने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर नांदा सौख्यभरे, घाडगे अँड सून सारख्या मालिका त्याने केल्या. नुकताच तो अग्गंबाई सूनबाई मालिकेतही झळकला होता.
पल्लवी सुभाष:
तिची मूळ नाव पल्लवी सुभाष शिर्के. चार दिवस सासूचे, अधुरी एक कहाणी यासारख्या मालिकेतून पल्लवी सुभाष झळकली होती. त्यानंतर हिंदीत जात तिने तुम्हारी दिशा, करम अपना अपना, कसम से, आठवा वचन, बसेरा, गोदभराई अशा अनेक मालिका केल्या. गुंतता हृदय हे या मालिकेतून तिने ग्लॅमरस भूमिकेत मराठीत पुनरागमन केलं होतं. असा मी अशी ती, प्रेमसूत्र, हॅपी जर्नी हे मराठी, विकी डोनर हा हिंदी, तर काही तेलुगू सिनेमातही तिने काम केलंय.
अक्षय वाघमारे:
अक्षय वाघमारे हा कुख्यात डॉन अरुण गवळीचा जावई म्हणजेच योगिता गवळीचा नवरा. त्याने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ‘ती फुलराणी’ या मालिकेतील त्याची भूमिका गाजली होती. अक्षय त्याच्या फिटनेस व्हिडिओसाठी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. लॉकडाऊनच्या काळातही तो व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत होता.
19 सप्टेंबरला संध्याकाळी सात वाजता ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर झाल्यानंतर दररोज रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे. शंभर दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र बंदिस्त होतील. अनलॉक एंटरटेनमेंट अशी बिग बॉसच्या नव्या सिझनची थीम आहे.
View this post on Instagram
Bigg Boss Marathi 3 is the third season of the Marathi version of the reality television show Bigg Boss broadcast in India.The show will be premiere on 19 September 2021 on Colors Marathi and Voot with Mahesh Manjrekar as the host for the third time.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: Bigg Boss Marathi 3 confirmed list of contestants this season.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार