5 February 2025 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या
x

Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर

Bigg Boss Marathi

Suraj Chauhan | 2024 च्या मराठी बिग बॉसचे यंदाचे पर्व प्रचंड गाजले. शेवटी बारामतीच्या रांगड्या गडीने म्हणजेच आपल्या भोळ्या सुरजने ट्रॉफीचा मान पटकावला. सुरज त्याच्या रील मुळेच प्रचंड फेमस होऊन बिग बॉसच्या घरामध्ये आला होता. त्याच्या चाहत्यांनी बाहेरपेक्षा घरामध्ये असताना त्याला भरभरून प्रेम दिल. त्याच्या भोळ्या स्वभावाने अनेकांची मने जिंकली. दरम्यान सुरजचा एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. हा व्हिडिओ बिग बॉस कंटेस्टंट राहिलेल्या एका सिंगरचा आहे.

तुम्हाला नक्कीच कळालं असेल की, बिग बॉस सीजन 5 चा उपविजेता अभिजीत सावंत याच्या गाण्यावर गुलीगतने सुंदर आणि रोमँटिक अशी व्हिडिओ केली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरज अभिजीतच्या ‘मोहब्बते लुटाऊंगा’ या गाण्यावर रील बनवताना दिसत आहे. यामध्ये तो एका झाडामागून चालत येऊन गाण्यांचे बोल गुणगुणतोय.

सुरजच्या व्हिडिओला कौतुकाच्या कमेंट :
सुरज चव्हाणच्या बिग बॉस नंतरच्या पहिल्या व्हिडिओला तब्बल 334,762 मिलियन एवढे लाईक मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेकांनी कमेंटमध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर अभिजीत सावंतने देखील सुरजला ‘आय लव यू’ अशी कमेंट केली आहे. अभिजीतच्या कमेंटला देखील लाखोंच्या घरात लाईक्स मिळाले आहेत. दरम्यान ‘असेच व्हिडिओ बनव भावा,. ‘गरिबीतून वर आला आहेस बिना आई-वडिलांचा मोठा झालास देव तुझी खुप प्रगती करो दादा’. अशा पद्धतीच्या भाऊक आणि कौतुकास्पद कमेंट सुरजच्या चाहत्यांनी केले आहेत.

सुरज आता आणखीन कोण कोणत्या व्हिडिओ बनवणार सोबतच बाहेर आल्यानंतर आनंद शिंदे सुरजसाठी एक गाणं गाणार होते या सर्व गोष्टींची तयारी पाहण्यासाठी सुरजचे चाहते प्रचंड आतुर झाले आहेत.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan 25 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x