16 April 2025 6:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Bigg Boss Marathi | संग्रामची अरबाजला ताकदीची धमकी; दोन बॉडी-बिल्डरची आपापसात झुंज, प्रोमो पाहिलात का?

Highlights:

  • बिग बॉस कॅप्टनसी टास्क
  • दुश्मनी घेतलेले दोन बॉडी बिल्डर
  • बिग बॉसने एक भन्नाट असा टास्क दिला
  • वायरल व्हिडिओ
Bigg boss Marathi

Bigg Boss Marathi | मराठी बिग बॉस या कार्यक्रमाने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकजण बिग बॉसच्या घरातील हालचालींबाबत आपापली प्रतिक्रिया देत असतो. दरम्यान खराखुरा गेम या आठवड्यापासून सुरू झाला असून, नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला. त्याचबरोबर वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणजेच संग्राम चौगुले याने नावडता सदस्यांना पाण्यामध्ये ढकलून टास्क पूर्ण केला.

बिग बॉस कॅप्टनसी टास्क
अशातच बिग बॉस यांनी कॅप्टनसी टास्क सगळ्यांसमोर आणून ठेवला आहे. परंतु निकी प्रितेश भाऊंनी दिलेल्या शिक्षेनुसार या कॅप्टनची टास्कमधून बाद झाली आहे. तरीसुद्धा ती तिच्या जिगरी मित्राला म्हणजेच अरबाजला सपोर्ट करताना दिसणार आहे. दरम्यान कॅप्टनसी टास्क पार पडतानाचा एक प्रोमो सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

दुश्मनी घेतलेले दोन बॉडी बिल्डर
यामध्ये पहिल्याच दिवसापासून दुश्मनी घेतलेले दोन बॉडी बिल्डर घरातून बाहेर निघेपर्यंत दुश्मनी निभावणार की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या टास्कमध्ये दोघेही एकमेकांना टशन देताना दिसणार आहेत. प्रेक्षक हा भाग पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत.

बिग बॉसने एक भन्नाट असा टास्क दिला
कॅप्टनसी कार्य पार पाडण्यासाठी बिग बॉसने एक भन्नाट असा टास्क दिला आहे. या टास्कमध्ये कॅप्टनसी कार्यातून बाद करणाऱ्या सदस्यांच्या नावाच्या गोण्यांमध्ये कापूस भरायचा आहे. या कार्याचा क्रमवार सोशल मीडियावर तुफान वायरल झालेला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अरबाज आणि संग्राममध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडलेली दिसतीये. दोघं अक्षरशः एकमेकांना झुंज देताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर दोघांमध्ये बाजाबाची देखील झालेली दिसते. हा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

वायरल व्हिडिओ
वायरल झालेल्या व्हिडिओला अनेकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून “संग्राम दादाने आज अरबाजला आपटला पाहिजे”, “आज राडा होणार” अशा पद्धतीच्या भन्नाट कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अनेकांच्या कमेंट पाहता संग्रामने अरबाजची सगळी गुर्मी काढली पाहिजे असंच प्रत्येकाला वाटत आहे.

Latest Marathi News | Bigg boss Marathi Arbaz and Wildcard Sangram Chougule huge fight in captaincy task 12 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या