Bigg Boss Marathi | आधी वाइल्डकार्ड एन्ट्री नंतर अरबाज पटेल, 'या' सदस्याच्या बाहेर जाण्याने निक्कीने फोडला टाहो - Marathi News
Highlights:
- Bigg Boss Marathi
- अरबाज पटेलने घेतला घराचा निरोप :
- या कारणामुळे संग्राम घराबाहेर पडला :

Bigg Boss Marathi | बिग बॉसचा या आठवड्यामध्ये शनिवार आणि रविवार भाऊच्या धक्क्याने नाही तर, महाराष्ट्राच्या धक्क्याने गाजला. या आठवड्यात घरातील सदस्यांची शाळा घेण्यासाठी रितेश भाऊ नाही तर ‘चला हवा येऊ’ द्या फेम डॉक्टर निलेश साबळे यांनी महाराष्ट्राच्या धक्क्याची दोर हाती घेतली होती.
अगदी रमत-गमत आणि मज्जा करत निलेशने घरातील सर्व सदस्यांबरोबर वेळ घालवला. सोबतच नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटातील कलाकारांनी देखील बिग बॉसच्या घरात उपस्थिती दर्शवली. दरम्यान आठवडा समाप्त म्हणजेच कोणता तरी एकच सदस्य घराबाहेर जाणार. परंतु या आठवड्यात एक नाही तर दोन सदस्यांना घराचा निरोप घ्यावा लागला. काय आहे कारण पाहूया.
अरबाज पटेलने घेतला घराचा निरोप :
बिग बॉस यांनी नॉमिनेशन कार्य पार पाडले. यामध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेस निक्की, अरबाज, सुरज, जानवी आणि वर्षा हे पाच सदस्य नॉमिनेट झाले होते. कार्यादरम्यान पाचहीजण एका रूममध्ये उभे होते. त्यांच्यासमोर सुटकेस ठेवण्यात आले होते. काही सुटकेसमध्ये सेफ तर काहींमध्ये अनसेफ असे बोर्ड ठेवण्यात आले होते. वर्षा, सुरज आणि जानवी हे तिघं एका मागोमाग सेफ झाले.
परंतु निक्की आणि अरबाज यांच्यात कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं होतं. दरम्यान निक्कीच्या चाहत्यांनी तिला सेफ करून अरबाजला घराबाहेर काढलं आहे. आता अरबाज आपल्या सोबत राहणार नाही, तो आपल्याला सोडून चालला आहे या विचाराने निकीने टाहो फोडत चक्क अरबाजचे पाय धरले. ओकसाबोकशी रडत आणि अरबाजचे पाय धरत निक्की म्हणाली,” अरबाज मला सोडून जाऊ नको’. त्याचबरोबर जानवी देखील प्रचंड भावुक झाल्याची दिसली. अरबाजचा A ग्रुपमधील चांगला वावर दाखवत त्याची जर्नी दाखवली गेली. तेव्हा देखील अरबाज रडत असताना दिसला.
View this post on Instagram
या कारणामुळे संग्राम घराबाहेर पडला :
बीबींनी दिलेल्या एका टास्कदरम्यान संग्रामची आणि घरातील काही सदस्यांची झटापट झाली. अंड टोपलीमध्ये ठेवण्याच्या टास्कदरम्यान संग्रामचा हात मनगटामध्ये फ्रॅक्चर झाला. चला प्रचंड प्रमाणात त्रास होऊन वेदना सहन कराव्या लागल्या. त्याच्या हातावर तात्काळ उपचार करण्यात आले. परंतु आणखीन चांगले उपचार घेण्यासाठी सोबतच असा मोडलेला हात घेऊन बिग बॉसच्या घरातील एकही टास्क खेळता येणार नाही यासाठी बीबींनी स्वतःहूनच वाइल्ड कार्ड एन्ट्री संग्राम यांना घराबाहेर जाण्याचा आदेश दिला.
आदेशाचे पालन करून संग्राम आपल्या नावाची पाटी घेऊन घराचा निरोप घेतला. त्यावेळी जानवी घरामध्ये जाऊन बिग बॉस यांना धन्यवाद म्हणाली. मी,’ बरं झालं बिग बॉस तुम्ही संग्रामला बाहेर काढलत’. तर, अशाप्रकारे या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून दोन सदस्य बाहेर पडले. आता अरबाजच्या नसल्यामुळे निक्की एकटी पडते की काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झालेला आहे.
Latest Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel evicted from Bigg Boss 23 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON