21 September 2024 4:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Triumph Speed T4 Vs Royal Enfield Classic 350 | तरुणांनो, ट्रायम्फ की रॉयल एनफील्ड, किंमत, इंजिन, फीचर्स पाहून ठरवा CIBIL Score | पगारदारांनी या 7 चुका टाळाव्या, अन्यथा CIBIL स्कोअर खराब होऊन कोणतंही कर्ज मिळत नाही - Marathi News Bigg Boss Marathi | निक्कीने डाव पलटला; एकाच पर्वात दुसऱ्यांदा कॅप्टन झाला अरबाज - Marathi News SBI Mutual Fund | 4 पटीने पैसा वाढेल, SBI फंडाच्या खास योजना देतील मोठा परतावा, फायदा घ्या - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिमाण, यापूर्वी 1100% परतावा दिला - Marathi News Patel Engineering Share Price | 58 रुपयाचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, रॉकेट स्पीडने कमाई होणार - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
x

Bigg Boss Marathi | निक्कीने डाव पलटला; एकाच पर्वात दुसऱ्यांदा कॅप्टन झाला अरबाज - Marathi News

Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सुरू आहे. या खेळात सध्या आठवा आठवडा सुरू आहे. आठवा आठवडा सुरू झाल्याबरोबर घरातील सर्व स्पर्धक  कॅप्टनसीसाठीसज्ज झाले होते. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात कॅप्टनसीची धुरा पुन्हा एकदा अरबाज पटेलच्या हातात आली आहे. निक्कीमुळे अरबाजला पुन्हा एकदा कॅप्टन होण्याचा मान मिळवता आला आहे.

कॅप्टनसी टास्क :
दरम्यान, या आठवड्यात कॅप्टनसीसाठी वर्षा, सूरज, धनंजय आणि अरबाज असे चार उमेदवार मैदानात होते. यावेळी कोणाचं गोड पाणी कुणाची ताहन भगवणार हे कार्य पार पडलं. या कार्यात निक्की, अंकिता, पॅडी आणि सूरज यांना पळत जाऊन गजर वाजवायचा होता. यावेळी पाण्याचे डब्बे भरून ठेवण्यात आले होते.

अशा पद्धतीने अरबाज पुन्हा एकदा झाला कॅप्टन :
निक्की, अंकिता, पॅडी आणि सूरज यांना पाळत जाऊन बजर वाजवत आपल्या सर्धकला सेफ करून कॅप्टन करायचे होते. यावेळी निक्कीने दोन्ही वेळा पळत जाऊन अरबाजचे नाव कॅप्टनसीसाठी जिंकले आणि अशा पद्धतीने अरबाज पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात कॅप्टन झाला अही.

निक्कीने मिळवून दिली कॅप्टनसी :
अरबाजने या आधी देखील कॅप्टन होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर एका टास्कमध्ये त्याने निक्कीला आपली कॅप्टनसी गिफ्ट म्हणून दिली होती. त्यावर निक्कीने पुन्हा एकदा अरबाजसाठी टास्क खेळून त्याला कॅप्टनसी मिळवून दिली आहे. अरबाज या पर्वात दुसऱ्यांदा कॅप्टन झाला आहे. बिग बॉसच्या घरातील पाचव्या पर्वाचा अरबाज हा पहिलाच सदस्य आहे ज्याने दुसऱ्यांदा कॅप्टन होण्याचा मान मिळवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

कॅप्टनसीवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली :
अरबाज कॅप्टन झाला असला तरी नेटकरी नाराज आहेत. अनेकांनी निक्की नसती तर अरबाज यावेळी घरातून बाहेर निघाला असता असं म्हटलं आहे. तसेच काहींनी निक्कीच कॅप्टन झाली आहे अशी कमेंट केली आहे. कारण अरबाज निक्की सांगेल तेच ऐकतो असंही कमेंटमध्ये म्हटलं आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli and Arbaz 21 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x