केंद्र सरकार नक्कीच कमी पडतंय, स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवा, अनुपम खेर यांनी झापलं
मुंबई, १३ मे | बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे कट्टर समर्थक आणि मोदी भक्त समजले जातात. मात्र आता देशातील कोरोनाच्या भीषण परिस्थितीवरुन त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार कुठे न कुठे कमी पडलं असून स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं हे महत्वाचं आहे अशा प्रकारची टीका अभिनेते अनुपम खेर यांनी केली आहे. अभिनेता अनुपम खेर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केलंय. अनुपम खेर यांनी मोदी सरकारवर केलेल्या या टीकेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
अनुपम खेर यांना सरकारची प्रतिमा निर्मिती करण्याचा प्रयत्न आणि काही नद्यांमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांचे प्रेत दिसत असल्यासंबंधी एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना अनुपम खेर म्हणाले की, “या प्रकरणात सरकारवर जी टीका होतेय ती वैध आहे. या परिस्थितीत सरकारने ते काम करावं ज्यासाठी त्यांना निवडून दिलं आहे. देशात आज जी काही परिस्थिती आहे त्यावर कोणालाही वेदना होऊ शकतात. देशातील नद्यांमध्ये तरंगणारी प्रेतं यावरुन कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करण्याची ही वेळ नाही. आपण देशातील एक जबाबदार नागरिक या नात्याने सरकारला जाब विचारला पाहिजे, आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत.”
अनुपम खेर यांनी अशा प्रकारचे मत व्यक्त केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर या भाजपच्या खासदार आहेत. मागील गेल्या आठवड्यात एका व्यक्तीने देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन मोदी सरकारवर ट्वीटच्या माध्यमातून टीका केली होती. त्यावर अनुपम खेर यांनी ‘आयेगा तो मोदीही’ असं उत्तर दिलं होतं. त्यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
News English Summary: Bollywood actor Anupam Kher is considered a staunch supporter of the Narendra Modi government at the Center and a Modi devotee. But now they have targeted the Modi government over the dire situation in the country. Actor Anupam Kher has said that the government has fallen short somewhere and it is more important to save the lives of the people than to create an image of oneself.
News English Title: Bollywood actor Anupam Kher criticized Modi govt over mismanagement of handling corona pandemic news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो