22 November 2024 5:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

स्वयंघोषित फिल्मी झाशीची राणी कंगनाला शिवसैनिकांची भीती वाटतेय | असं पाऊल उचललं....

Bollywood, actress Kangana Ranaut, Filed a petition, Supreme Court

मुंबई, ०२ मार्च: बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये दाखल करण्यात आलेले तिन्ही खटले हिमाचल प्रदेशमधील न्यायालयात हलवण्यात यावे अशी मागणी कंगनाने केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा कंगना राणावतने केला आहे. कंगनावर सध्या ३ खटले सुरू आहे. वादग्रस्त ट्वीट केल्या प्रकरणी कंगनावर खटलाही सुरू आहे.

कंगना आणि रंगोली यांनी सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे, त्यांच्यावर मुंबईत तीन खटले सुरु आहेत. मात्र आपल्याला शिवसेना नेत्यांकडून धोका आहे. जर मुंबईत या खटल्याची सुनावणी झाली तर भडास काढण्यासाठी शिवसेना नेते टोकाची पावलं उचलू शकते, असं कंगनाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. कंगना आणि तिच्या बहिणीने वकील नीरज शेखर यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात स्थानांतरण याचिका दाखल केली आहे.

अली काशिफ खान आणि मुनव्वर अली सय्यद यांनी दोन खटले दाखल केले आहे. यामध्ये कंगनाच्या ट्वीटमुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण केला जाण्याचा आरोप करण्यात आला आहे. तर तिसरा खटला हा गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केला आहे. जुहू पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी तक्रार केली होती. कंगनानं मानहानी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता.

 

News English Summary: Bollywood actress Kangana Ranaut and her sister Rangoli Chandel have filed a petition in the Supreme Court. Kangana has demanded that the three cases filed in Maharashtra be moved to a court in Himachal Pradesh. Kangana Ranaut has claimed that her life is in danger from Shiv Sena leaders. Kangana is currently facing 3 cases. Kangana is also on trial for controversial tweets.

News English Title: Bollywood actress Kangana Ranaut have filed a petition in the Supreme Court news updates.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x