सुशांतला ब्रेकअप करायचा होता म्हणून रियाकडून त्याचा छळ, अंकिताचा आरोप
मुंबई, ३० जुलै : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. सुशांतच्या कुटुंबाकडून पाटण्यामध्ये त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या नावे गुन्हा नोंदवण्यात आला. ज्यानंतर हालचालींना वेग आला आणि बिहार पोलिसांनी थेट मुंबई गाठली. या साऱ्या प्रकरणामध्ये अभिनेत्री आणि सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी अर्थात त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिचंही नाव पुढं येत आहे.
बिहार पोलिसांनी अंकिताची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये तिनं काही धक्कादायक खुलासे केल्याचंही बोललं जात आहे. बुधवारी अंकिताची बिहार पोलिसांनी चौकशी केली असतना तिनं सुशांतशी आपलं २०१९ मध्ये बोलणं झाल्याची माहिती दिली. अंकिताचा ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याच काळात त्यांचं बोलणं झालं होतं. ज्यावेळी सुशांतनं रिया चक्रवर्तीसोबतच्या त्याच्या नात्याविषयी अंकिताला काही गोष्टी सांगितल्या होत्या.
आपल्या पदार्पणाच्याच चित्रपटासाठी शुभेच्छा देण्यासाठी म्हणून सुशांतनं आपल्याला मेसेज केल्याचं अंकितानं पोलिसांना सांगितलं. त्यावेळी तो बराच भावनिक झाला होता, असंही ती म्हणाली. आपण या नात्यात आनंदी नसल्याचं म्हणत रिया आपला छळ करत असल्यामुळं या नात्यातून बाहेर पडण्याबाबत तो बोलला होता असंही अंकितानं सांगितलं.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी त्याची कथित प्रेयसी व अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी पाटणा पोलिसांची चार जणांची टीम मुंबईला आली. मात्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस जेव्हा रियाच्या घरी पोहोचले तेव्हा ती घरातून गायब असल्याचं निदर्शनास आलं. अटकपूर्व जामिनासाठी रियाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचंही म्हटलं जात आहे.
जामीन मिळवण्यासाठी रियानं अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांची केस लढणाऱ्या भारतील प्रसिद्ध वकिलांपैकी एक असलेल्या मानशिंदे यांना नेमलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल दीड महिन्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरूद्ध फिर्याद दाखल केली. पाटण्यातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, बिहार पोलीस सध्या मुंबईत तपासासाठी दाखल झाले आहेत. रियावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याबरोबरच इतरही गंभीर आरोप सुशांतच्या वडिलांनी केले आहेत.
News English Summary: It is learned that Ankita Lokhande was questioned by the Bihar police. In which she is also said to have made some shocking revelations. When Ankita Lokhande was questioned by Bihar police on Wednesday, she informed that she had talked to Sushant in 2019.
News English Title: Bollywood actress Rhea Chakraborty harassed Sushant Singh Rajput told ex girlfriend Ankita Lokhande tells Bihar Police News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय