22 February 2025 3:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Aditi Rao Hydari | अदिती आणि सिद्धार्थच्या लग्नात 'तो' फोटो घेण्यासाठी करावे लागले होते चांगलेच कष्ट, शेअर केला अनुभव

Highlights:

  • Aditi Rao Hydari
  • असं म्हणाला फोटोग्राफर
  • एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून उभे
Aditi Rao Hydari

Aditi Rao Hydari | अभिनेता सिद्धार्थ आणि अभिनेत्री अदिती राव हैदरी हे दोघं नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. 16 सप्टेंबर रोजी दोघांनी लग्न गाठ बांधली. अदिती राव हैदरी ब्रायडल लुकमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. अशातच या दोघांच्या लग्नामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघांनीही आपलं नातं अतिशय प्रायव्हेट ठेवण्याचा प्रयत्न केला आणि 16 सप्टेंबरला सर्वांना ही गोड बातमी सांगत लग्नबंधनात अडकले.

या दोन्ही कलाकारांच्या लग्नाचे फोटो जो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने वाहत आहेत. त्याचबरोबर सेलिब्रिटी फोटोग्राफर जोसेफ राधिक याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या दोघांचा तो फोटो काढण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागले अशा पद्धतीचा मेसेज केला आहे. नेमकं काय म्हणालाय जोसेफ राधिक पाहूया.

असं म्हणाला फोटोग्राफर :
सेलिब्रेटी फोटोग्राफर जोसेफ राधिक याने अदिती आणि सिद्धार्थचा फोटो घेताना त्याला किती मेहनत घ्यावी लागली हे सांगितलं आहे. त्याने बिहाइंड द सीन असं लिहत पुढे लिहिलंय की,”लेयर्स बनवून, प्रकाशाचा पाठलाग करणे हे दोन्हीही माझ्या छायाचित्रणाच्या युक्त्या आहेत”. अशा पद्धतीचं कॅप्शन लिहत फोटोग्राफरने दोघांचे दोन फोटोज शेअर केले आहेत.

एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून उभे
फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे अदिती आणि सिद्धार्थ एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून उभे आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री फोटोग्राफर चाललेस कडे पाहताना दिसतीये तर, सिद्धार्थ ज्या पोझिशनमध्ये उभा आहे तिथेच सरळ पाहताना दिसत आहे. त्यांच्या या फोटोला बॅकग्राऊंडमुळे शोभा आली आहे. पाठीमागून केशरी सूर्याची किरण अभिनेत्याच्या चेहऱ्यावर पडत आहेत. अशा पद्धतीचा दोघांचा सुंदर आणि युनिक फोटो व्हायरल झाला आहे.

अदितीच्या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, आदितीने आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. तिने साईड रोलच्या अनेक भूमिका साकारल्या आहेत. बाजीराव मस्तानी या चित्रपटामध्ये आपल्याला अदितीची कामगिरी पाहायला मिळाली. त्यानंतर अदिती ‘हिरामंडी’ या चित्रपटात पाहायला मिळाली. तिचं ‘सय्या हटो जाओ’ हे गाणं प्रेक्षकांना फारच आवडलं. हिरामंडीमधील अदितीच्या लुकवर अनेक तरुण मंडळी घायाळ झाले होते. तिच्या गाण्याची क्रेझ अजून देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर सिद्धार्थने देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचा फूड इन्स्पेक्टरचा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. सध्या दोघेही आपल्या लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करत आहेत.

Latest Marathi News | Bollywood Aditi Rao Hydari Siddharth wedding photo 20 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Aditi Rao Hydari(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x